ई.व्ही.एम. मशिन बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हीधिकारी कार्यालया समोर निदर्शने
जालना/गंगाराम मगरे (प्रतिनिधी) : राज्यात व देशात होणार्या लोकसभा निवडणूका या ई.व्ही.एम. (म्टड) मशिनद्वारे घेण्यात येवू नये व ई.व्हि.एम. मशिन बंद करण्यात यावी. या मागणीसाठी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने दि.05 फेबु्रवारी 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.
भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरीकांना दिलेला मतदानाचा अधिकार हा (म्टड) ई.व्ही.एम मशिन हिरावून घेत आहे. त्यामुळे आगामी काळात होनार्या लोकसभा निवडणूका मध्ये ई.व्ही.एम मशिन बंद करून निवडणूका या ई.व्ही.एम. मशिनवर घेवू नये कारण अनेक तज्ञमंडळीनी ई.व्ही.एम मशिन हॅक करता येते व ज्याला निवडून द्यायचे आहे. त्याला निवडून आनता येते. हे दाखवून दिले असतांनाही बिजेपी सरकार व आर.एस.च्या अधिपत्याखली काम करणारे निवडणूक आयोग (म्टड) ई.व्ही.एम.चा हट्ट धरून बसलेले दिसते.
या सर्व घटना लोकशाहीवर गदा येत असल्याने रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने व निशेध करण्यात आला. यावेळी निवेदनावर रविंद्र म्हस्के, राहूल खरात, बाबासाहेब लहाने, दिनेश आदमाने, रत्नदिप पांडे, नुमान शेख, बाबासाहेब खरात, सौरभ जाधव ईत्यादीसह अनेकाच्या स्वाक्षर्या आहेत.