पुणे/प्रतिनिधी ः मूकनायकच्या सोशल मीडीयाच्या पत्रकाचे प्रकाशन सोहळ्याची सुरूवात पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रकाश करण्यात आले, सोशल मीडीयाच्या पत्रकाचे वंचित बहुजन आघाडीचे नेते व पुणे शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष वसंत (दादा) साळवे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या वेळी संपादक तुषार विनायक गायकवाड, प्रकाश साळवे (अध्यक्ष दलित पँथर, पुणे), रोहिदास गायकवाड (कॉन्टोंमेंटचे माजी उपाध्यक्ष), रमेश जगताप (माजी अधिकारी ससून हॉस्पिटल), प्रदीप कांबळे (कार्याध्यक्ष भीम शक्ती, पुणे), सुनिल एच. गायकवाड (पत्रकार), आनंद कांबळे (पत्रकार) आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या उद्देशाने मूकनायक वर्तमान पत्राची सुरूवात केली होती त्याच उद्देशाने दि.31 जानेवारी 2021 रोजी मूकनायकला 101 वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने राष्ट्रीय भाषा (हिंदी) मध्ये मासिक स्वरूपात जवळपास सर्वच राज्यांमध्ये वितरित करणार असल्याचे संपादक तुषार विनायक गायकवाड यांनी या वेळी सांगितले.
या वेळी बोलताना वसंत (दादा) साळवे म्हणाले की, तुमच्या सारख्या नवीन पिढी मूकनायक वर्तमान पत्राची तब्बल 101 वर्षांनी परत सुरूवात करते आहे, खूप अभिमानाची गोष्ट आहे, चळवळींना व समाजास वर्तमानपत्राची खरी गरज आहे. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारीता करित रहा, आपली सावली आपल्याशी गद्दारी करणार नाही याची काळजी घेण्याचा मौलीक सल्लाही या वेळी अर्वजून सांगण्यात आले.
दादांच्या या सल्ल्यास उत्तर देताना संपादक तुषार गायकवाड म्हणाले की, आपण दिलेल्या मौलीक सल्ल्यास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारास तडा जावू देणार नसल्याचे सांगितले. मूकनायकच्या माध्यमातून पुन्हा एकदा गरिब व शोषित जनतेच्या वेदना सरकारपर्यंत व इतर जनतेपर्यंत पोहचविणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.