महाडच्या ग्रामीण पूरग्रस्तांना रिपब्लिकन (आठवले) पक्षाच्या वतीने मदत
युवक आघाडी अध्यक्ष रमेश गायकवाड यांचा पुढाकार
मुंबई दि. 4 – अतिवृष्टीने महाड तालुक्यातील ग्रामीण भागासह संपूर्ण महाड शहराला पुराचा मोठा फटका बसला आहे.जनजीवन विस्कळीत करीत अनेकांचे संसार या पुरात वाहून गेले आहे.तलये गाव तर दरड कोसळून होत्याचे नव्हते झाले. या भागाचा दौरा करून आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पूरग्रस्त आणि दरड ग्रस्तांना जमेल तेव्हढी मदत करण्याची सूचना केली. त्यानुसार रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडी चे मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या पुढाकारातून महाडमधील पूरग्रस्तांना कपडे वाटप करण्यात आले.
महाड तालुक्यातील पंचशीलनगर ; सुकट गल्ली; भोराव बौद्ध वाडी; भावे बौद्ध वाडी; आसनपोई; चांडवे या गावांमध्ये जाऊन रिपाइं युवक आघाडी मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी पूरग्रस्तांना आवश्यक असणारे विविध कपडे त्यात पॅन्ट; शर्ट; टी शर्ट ; बर्म्युडा पॅन्ट; मॅक्सी आदी उपयोगी कपडे आणि मदत पूरग्रस्तांना रिपब्लिकन पक्षातर्फे देण्यात आली.
रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या राष्ट्रीय मार्गदर्शक सौ.सीमाताई आठवले यांनी रिपाइं तर्फे देण्यात येणाऱ्या मदतीच्या टेम्पोला झेंडा दाखवून महाड ला रवाना केले. कोकण ; महाड ; चिपळूण;सातारा पाटण;वाई; सांगली कोल्हापूर या भागातील पूरग्रस्त आणि दरडग्रस्त नागरिकांना रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने जमेल तशी मदत करावी असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.