मूकनायक -चंदू मोरे
महागांव (यवतमाळ) :- निवडणूक लढवित असतांना जनतेला अनेक कामाचे आश्वासने दयावे लागतात. निवडून आल्यानंतर मात्र दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करतांना, फंड खेचून आणतांना किती तारेवरची कसरत करावी लागते ते निर्वाचित पदाधिकार्यांनाच माहीत. परंतू अशाही परिस्थितीत कोरोनामय आर्थिक टंचाईच्या काळात जि.प. चा फंड आणून प्रामाणिकतेने आश्वासनांची पुर्तता करणार्या जि.प. सदस्या वर्षाताई नानासाहेब भवरे ह्या एकमेव समाजसेविका ठरल्या आहेत.
ग्राम गुंज येथे आज ठिक ११ वाजता जनसुविधा फंडातुन कब्रस्तान ईदगाह, शिक्षण विभाग फंडातून ४ अंगणवाडी ईमारत व तसेच दलित वस्ती फंडातुन २ सिमेंट काॅंक्रीट रस्ते ईत्यादी आवश्यकतापुर्ण कामांचे वर्षाताई भवरे (जि.प. सदस्या) यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले. याप्रसंगी गुंज वासियांनी वर्षताईंचे आभार मानून समाधान व्यक्त केले. यावेळी नानासाहेब भवरे, सरपंच व उपसरपंच आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती.