Sunday, December 22, 2024
Homeपश्चिम महाराष्ट्र"एक मदतीचा हात" बोधी फौंडेशन कराडच्या वतीने.

“एक मदतीचा हात” बोधी फौंडेशन कराडच्या वतीने.

कराड दि.10 “एक मदतीचा हात” बोधी फौंडेशन कराडच्या वतीने आज सकाळी दहा वाजता शंभू रत्न परिवर्तन फौंडेशन संचलित वुद्धाश्नम ,या ठिकाणी जाऊन अनाथ आणि वयोवृद्ध माता भगिनी आणि अपंग लोकांना मदत म्हणून थंडीत जो त्रास होतो त्या पासुन त्याचे   संरक्षक व्हावे यासाठी ब्लँकेट देण्यात आली.
बोधी फौंडेशन ही सामाजिक संस्था नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत असते.
बोधी फौंडेशन ने आजपर्यंत कोरोना काळात गरीब व गरजु लोकांना घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तू चे वाटप केले आहे. तसेच बोधी फौंडेशनने पुढील काळात पाचशे झाडे लावण्यात चा संकल्प केला असुन आजपर्यंत दोनशेहून अधिक झाडे लावली आहेत,
शिक्षण क्षेत्रात काम करत संस्थेने प्राथमिक शाळेतील विध्यार्थाना सामाजिक, राजकीय, आणि वैज्ञानिक  क्षेत्रातील विचारवंत याची पुस्तक वाटप करून एक नविन आदर्श निर्माण केला आहे
या प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमामधे संस्थेचे अध्यक्ष विकास मस्के ,संस्थेचे उपाध्यक्ष विजय मदने, सचिव सुहास पाटील, तसेच कोषाध्यक्ष पंडित गायकवाड,  संस्थेचे सल्लागार उद्योजक सतिश फाळके व इतर सदस्य आपला सहभाग नोंदवितात
- Advertisment -

Most Popular

Recent Comments