मूकनायक प्रतिनिधी :- विकास मस्के
शिक्षणामुळे व्यक्तीची सर्वांगीण प्रगती होते आणि संविधानाने अनेक मानाची पदे मिळवता येतात असे प्रतिपादन कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे यांनी केले . सभापतींच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून आदरांजली वाहण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त ,”एक वही एक पेन” विद्यार्थ्यांना वाटप या कार्यक्रमात सभापती प्रणव ताटे बोलत होते. बाबासाहेबांच्या मुळेच मी सभापती पदापर्यंत पोहोचू शकलो, बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज सामान्य माणूस देखील मुख्यमंत्री आमदार पंतप्रधान राष्ट्रपती खासदार होऊ शकतो एवढी ताकद बाबासाहेबांच्या सविधानाने आपल्याला दिली आहे.असे मत यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केले.
कार्वे, तालुका कराड येथे बोधी फाउंडेशन ,ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अट्रोसिटी समितीचे सदस्य मा. सतीश फाळके, कार्वे गावचे सरपंच मा. संदीप भांबुरे माजी उपसरपंच रोहित जाधव, सदस्य जनार्दन देसाई उपस्थित होते यावेळी लोखंडे मॅडम, विदुला मस्के आणि शालेय विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक व सूत्रसंचालन शाळेचे उपमुख्याध्यापक वाघ सर यांनी केले. आभार प्रदर्शन बोधी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास मस्के यांनी केले. या कार्यक्रमास माजी सरपंच अधिकराव गुजले, रेश्मा रसाळ तंटामुक्तीचे उपाध्यक्ष संजय वायदंडे ग्रा. सदस्य अभिजीत वायदंडे, छाया मस्के,बबन रसाळ ,राजेंद्र रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बोधी फाउंडेशनचे उपाध्यक्ष ऍड.विजय मदने, कोषाध्यक्ष ऍड.पंडित गायकवाड ,संतोष मस्के, शुभम हुलवान ,शिवजित कांबळे, शुभम तोरणे, विजय वायदंडे, शुभम कांबळे या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले जि. प. शाळेच्या शिक्षिका अर्पणा काटकर ,पाटील मॅडम ,लोखंडे मॅडम, मुख्याध्यापिका मोरे मॅडम, वाघ सर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले तसेच अंगणवाडी सेविका शमा मुजावर, मंगल मस्के, वैशाली वाघमारे, रंजना जाधव, लतिका हुलवान,आशा गाडवे, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.