कराड 🙁 विकास मस्के)
कराड पंचायत समितीचे सभापती मा. प्रणव ताटे साहेब यांनी नुकतीच गोळेश्वर( कार्वे रोड) येथील दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या महा विहाराला सदिच्छा भेट दिली .यावेळी त्यांनी महाविहाराची पाहणी करून महा विहारासाठी भरघोस मदत देण्याचे आश्वासन दिले यावेळी बोलताना त्यांनी विहाराच्या बांधकामाची तसेच सुशोभीकरण करण्यासंबंधी पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या या कार्यक्रमास बोधी फाउंडेशनचे अध्यक्ष व मूकनायक चे कराड प्रतिनिधी विकास मस्के यांची उपस्थिती होती तसेच मी नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष विद्याधर गायकवाड तसेच गोळेश्वर गावचे सरपंच चंद्रकांत काशीद उपसरपंच प्रकाश जाधव, ग्रामसेवक पी एल चव्हाण हे उपस्थित होते
कराड येथे कार्वे रोड येथे महा विहाराचे बांधकाम सुरू असून त्याचा पहिल्या मजल्याचे बांधकाम चालू आहे त्या महा विहार समितीचे तालुका अध्यक्ष तानाजी बनसोडे यांनी महाविहाराची माहिती देताना विहारास ग्रामीण तसेच शहरी भागातून मोठ्या प्रमाणात मदत होते अनेक दानशूर येथे बांधकामासाठी मदत करतात अशी माहिती दिली यावेळी संस्थेचे समिती सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.