कराड :- (विकास मस्के)
मूकनायक या वर्तमानपत्राला 102 वर्ष झाल्याच्या निमित्ताने कराड येथे आज कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमास प्राध्यापक नितीन कसबे सर ,सातारा जिल्हा मुकनायक जिल्हा समन्वयक अँड.पंडित गायकवाड, कराड तालुका मूकनायक प्रतिनीधी विकास मस्के यासह मी नागरीक फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विद्याधर गायकवाड उपस्थित होते
मूकनायक हे वर्तमानपत्र सुरू करण्याचा बाबासाहेबांचा उद्देश अज्ञात अंधश्रद्धा तसेच लोकांना जागृत करणे हा होता बाबासाहेबांचे असे स्पष्ट मत होते की ज्या समाजाला उद्धार करायचा असेल तर पत्रकारिता सारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही पत्रकारिता कशी असावी हे बाबासाहेबांच्या मूकनायक या वर्तमानपत्राची मांडणी पाहून समजते. सामान्य लोकांना समजेल अशी भाषा व स्पष्टपणा बाबासाहेबांच्या पत्रकारितेत होता
मुकनायक काही कारणाने बंद पडला परंतु आज तो पुन्हा नव्या जोमाने सुरू करून त्याची वाचक संख्या वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे प्रतिपादन तालुका जिल्हा प्रतिनिधी यांनी यावेळी केले तसेच योग्य माहिती व प्रभावी मांडणी द्वारे मूकनायक या वर्तमानपत्राला घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन विकास मस्के यांनी केले
यावेळी दलित महासंघाचे सातारा जिल्हा अध्यक्ष राम दाभाडे तसेच दक्षता व संनियंत्रण समितीचे (ॲट्रॉसिटी )सदस्य सतीश फाळके तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते