Sunday, December 22, 2024
Homeकराडकापील येथे स्त्रीशक्ती ग्रामसंघ यांच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा..

कापील येथे स्त्रीशक्ती ग्रामसंघ यांच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा..

कराड :(विकास मस्के) कापील ता. कराड येथील महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती उमेद अभियान अंतर्गत स्त्रीशक्ती ग्राम संघ यांच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमास “यशदा’चे मास्टर ट्रेनर व मी नागरिक फाऊंडेशनचे अध्यक्ष विद्याधर गायकवाड तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक शासकीय समिती व बोधी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास मस्के,
स्त्रीशक्ती महिला ग्रामसंघ कापीलच्या अध्यक्षा सौ.सुवर्णा देशमुख, सचिव लताताई मोरे,योगप्रशिक्षक सुप्रियाताई घारगे,अनिता कुलकर्णी,यशस्वी उद्योजिका सौ‌.विशाखा पाटील,कापील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.सुषमाताई देशमुख,सदस्य सौ.नीता जाधव, सौ.सुनीता कुंभार,सौ.स्वाती सावंत, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नंदकुमार जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी “यशदा’चे मास्टर ट्रेनर व “मी नागरिक’ फाउंडेशनचे अध्यक्ष विद्याधर गायकवाड मार्गदर्शन करताना म्हणाले की,महिलांच्या हक्क आणि अधिकारासाठी अनेक लढाऊ महिला आणि महापुरुषाने या व्यवस्थेबरोबर संघर्ष करून हे हक्क अधिकार मिळवलेले आहेत. या हक्क आणि अधिकारांची जपणूक प्रत्येक महिलेने केली पाहिजे.या करिता महिलांनी संघटित राहून आपला कौटुंबिक,सामाजिक व आर्थिक विकास केला पाहिजे. तसेच इतर मान्यवरांनी जागतिक महिला दिना निमित्त आपले मनोगत व्यक्त केले योगप्रशिक्षक सुप्रियाताई घारगे व अनिता कुलकर्णी यांनी योगासनाचे महत्त्व व आरोग्य या बाबत मार्गदर्शन केले.व महिलांकरिता विशेष योगासन प्रशिक्षण कापील मध्ये आयोजित करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.तर यशस्वी उद्योजिका सौ‌.विशाखा पाटील यांनी महिलांनी ऑनलाईन व्यवसाय कसा वाढवावा व आपली आर्थिक उन्नती कशी करावी याबाबत आपले अनुभव कथन केले. स्त्री शक्ती ग्रामसंघच्याअध्यक्षा सौ.सुवर्णा देशमुख यांनी स्त्रीशक्ती महिला ग्रामसंघाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली.सीआरपी उज्ज्वला पाटील यांनी “उमेद’ अभियान विषयी माहिती दिली.
यानिमित्ताने कोरोना कालावधीमध्ये ज्यांनी उत्तम सेवा दिली त्यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर,ग्रामपंचायत कर्मचारी, डॉक्टर, पोलीस कर्मचारी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.विविध बचत गटातील महिलांनी खाद्यपदार्थ स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षीस ही देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.अंकिता जाधव यांनी केले. प्रास्ताविक सौ.सुवर्णा देशमुख यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार सुनीता डाईंगडे यांनी केले. या कार्यक्रमास कापिल गावातील 34 बचत गटाच्या महिला प्रतिनिधी व ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
Attachments area

- Advertisment -

Most Popular

Recent Comments