जिल्हा. प्र मुकनायक. चांदू मोरे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था महागांव व्दारा संचलीत सहावी बौध्द धम्म परिषद थाटामाटात संपन्न झाली असून फाल्गुन पौर्णिमेचे औचित्य साधून या भव्य बौध्द धम्म परिषदेचे मार्च 18 व 19 रोजी पौर्णिमेस आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक सागरदादा पाईकराव यांनी माध्यमाशी म्हटले आहे.
दिनांक १८ रोजी सकाळी ९ वाजता पुज्य भदंत राष्ट्रपाल महाथेरो मंचेरियाल तेलंगणा,भंन्ते काश्यप,भन्ते दिपंकर, भन्ते संघपाल,भन्ते मेत्तानंद यांचे हस्ते पंचशील ध्वजारोहण व धम्म परिषदेचे उद्घाटन करून धम्मदेशनेला सुरवात करण्यात आली होती. या नंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी,गायकांनी सुंदर गीतातून समाज प्रबोधन केले.यावेळी शेकडो बौध्द उपासक व उपासीकांनी हजेरी लावली होती.या दोन दिवसीय धम्म परिषदेचा समारोपीय कार्यक्रम व सत्कार १९ तारखेच्या रात्री ९ वाजता घेऊन सांगता करण्यात आली होती तर समितीच्या वतीने दोन्ही दिवस बेसन,पोळीचे भोजनदान करण्यात आले होते.
या वेळी जागतीक धम्म परिषद किनवट जिल्हा नांदेड चे आयोजक अरुणभाऊ आळणे,सम्राट अशोक बौध्द धम्म परिषद कारखेडचे आयोजक सुधाकर काबंळे,महागांव नगराध्यक्षा करुणा शिरबिडे, नगर सेवीका सुनीता डाखोरे,जयश्री इंगोले, गोविंदराव दवणे उमरखेड,राजेश माळवे, विश्वपाल धुळधुळे, नानासाहेब भवरे,शिलानंद काबंळे,निखील वाघमारे व सुदर्शन मारपवार किनवट या मान्यवरांचे धम्म परिषदेचे स्वागताक्ष शिक्षण महर्षी प्राचार्य मोहनराव मोरे व समितीचे अध्यक्ष यशवंतराव वंजारे महिला अध्यक्षा मायाताई पाईकराव निकीता पाईकराव,वंदना भवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.संचलन कुमार कांबळे तर अभार गजानन पाईकराव यांनी मानले.