कराड:- (प्रतिनिधी) विरवडे (ओगलेवाडी ) उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिजाऊ ग्राम संघ यांच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
या कार्यक्रमास बोधी फाऊंडेशनचे अध्यक्ष व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक शासकीय समिती (ॲट्रॉसिटी )सदस्य विकास मस्के, यशदाचे मास्टर ट्रेनर व मी नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष विद्याधर गायकवाड, विरवडे गावच्या सरपंच ,जिजाऊ महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा तेजश्री शिंदे, सचिव मनीषा पवार, कोषाध्यक्ष रुपाली जाधव, श्रमसाफल्य फाउंडेशनचे अध्यक्ष एँड. शहनाज शेख ,पंचायत समिती सदस्य मदने, हे उपस्थित होते. यावेळी बोधी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास मस्के यांनी जागतिक महिला दिनाची सुरुवात न्यूयॉर्क देशात 8 मार्च 1908 रोजी झाली तेथील वस्त्रोद्योग क्षेत्रातील महिलांनी आपल्या सुरक्षा व कामाचे तास यासाठी प्रचंड मोर्चा काढला आणि त्या मोर्चाची तेथील प्रशासनाला दखल घ्यावी लागली त्या आंदोलनामुळे महिलांना आपल्या हक्क व अधिकार याची जाणीव झाली
त्याचा आजच्या महिलांच्या जीवनावर काय परिणाम झाला याची माहिती दिली प्रत्येक महिलेने आपले हक्क व अधिकार याची जपणूक केली पाहिजे कारण हे हक्क आपल्याला अनेक महापुरुषांनी केलेल्या त्यागातून बलिदानातून मिळाले आहे. त्यामुळे त्याची जाणीव प्रत्येक महिलेने ठेवली पाहिजे.
पंचायत समिती सदस्य मदने यांनी महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या व विरवडे गावात सुरू असलेले काम अतिशय चांगले आहे व महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून तसेच स्वयंरोजगार करून आपली प्रगती केली पाहिजे असे मत व्यक्त केले.
एँड .शहनाझ शेख यांनी महिलांना आपले हक्क व स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायापासून बचाव करण्यासाठी असलेले कायदे याविषयी अतिशय सुंदर माहिती दिली व स्त्रियांना आपल्या हक्काची जाणीव करून दिली
विद्याधर गायकवाड यांनी स्त्रिया ह्या रणरागिणी आहेत कारण माँ. जिजाऊ होत्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करता आले तसेच महिलांचा गौरव करताना प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते अशी उदाहरणे देऊन महिलांचा गौरव केला
तसेच या कार्यक्रमा चे आभार जाधव मॅडम यांनी मांडले या कार्यक्रमास प्रभाग समन्वयक कुमारी ऐश्वर्या कुंभार मॅडम ,आर्थिक साक्षरता सखी शिरोमणी नांगरे मॅडम, विरवडे गावातील प्रेरिका श्रीमती कौशल्या जाधव तसेच विरवडे गावातील तेवीस बचत गटाच्या अध्यक्ष ,सचिव व सदस्य महिला ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होत्या.
Attachments area