सातारा (विकास मस्के) सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात व्याघ्र प्रकल्पातील दुर्गम गावांना वनविभागाच्या मदतीने बोधी फाउंडेशन व संस्कार सोशल फाउंडेशन संयुक्तरित्या भेटी देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या.
सातारा जिल्हा हा नैसर्गिक दृष्ट्या सदन असूनही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यांमध्ये दुष्काळ तर काही तालुके अतिदुर्गम भागात येतात की जिथे मूलभूत सुविधांची वानवा जाणवते अशाच महाबळेश्वर तालुक्यातील वघा वावरे ,उचाट ,कांदाट व लाजम या दुर्गम गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांच्या अडीअडचणी काय आहेत याविषयी ग्रामस्थांच्या उपस्थितीत बोधी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास मस्के तसेच संस्कार सोशल फाऊंडेशनचे सचिव एँड पंडित गायकवाड व सल्लागार सतीश फाळके यांनी चर्चा केली
कराड येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील उपसंचालक उत्तम सावंत साहेब यांच्या सहकार्याने वन विभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने व लोकोपयोगी कार्यक्रम राबवले जातात त्यांच्या मदतीने प्रकल्पग्रस्त गावांचे पुनर्वसन योग्य प्रकारे होत असून त्यांनी गव्हर्मेंट आणि सामाजिक संस्था यांचा समन्वय साधून चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी दुर्गम गावातील लोकांना भेटीचे आयोजित करतात
बोधी फाउंडेशन ने लॉक डाऊन च्या काळात गरजू कुटुंबांना मदत करण्याचे काम केले आहे ज्या मध्ये शुद्ध पाणी अन्नधान्य गृहोपयोगी साहित्य यांचेही वाटप केले आहे तसेच बोधी फाऊंडेशनने मागील वर्षी दोनशे वृक्ष लावण्याच्या उपक्रम हाती घेऊन तो पूर्ण केलेला आहे.
वन विभागाच्या माध्यमातून आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लोकांना रोजगाराच्या संधी, आरोग्य शिबिरे तसेच शिक्षण या क्षेत्रात काम करण्यासाठी संस्थांनी दुर्गम गावाना भेटी दिल्या
लाजम गावचे उपसरपंच गणपत कदम यांनी गावातील अडचणी सांगताना विजे संबंधी तसेच शालेय मुला-मुलींना येता-जाताना अडचणी येतात तसेच शिक्षक आणि सरकारी अधिकारी यांची दुर्गम गावात कामासंबधी अनास्था दिसून येते यावर सामाजिक संस्था म्हणून बोधी फाउंडेशन आणि संस्कार सोशल फाउंडेशन यांनी उपायोजना करण्याचे योजले आहे त्यामध्ये रोजगाराभिमुख कार्यक्रम राबवून लोकांचा विकास साधण्याचे काम करणार असल्याचे बोधी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास मस्के यांनी सांगितले ,सचिव एँड पंडित गायकवाड यांनी प्रशासनाची माहिती संबंधी शिबिरे राबून प्रशासन व कायदयाची माहिती आणि गावचा विकास कसा करावा यासंबंधी मार्गदर्शन केले तसेच सतीश फाळके यांनी लोकांना स्वयम रोजगार व शेती पूरक व्यवसाय याच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले यावेळी कादाट गावचे चे प्रवीण मोरे उचाट चे संजय मोरे व वघावावळे गावचे सिताराम जंगम आणि वन विभागाचे साहेब हसबनीस वनपाल पी बी पी हिटमुदे, वनमजुर विशाल पवार यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते