_ॲड. पंडीत गायकवाड_
जागतिक महिलादिनाचे औचित्य साधुन हिरोजी इंदुलकर फाउंडेशन कराड यांनी नुकताच महिला दिन साजरा केला. महिला दिनाच्या निमित्ताने महिला सक्षमीकरण महत्त्व पुन्हा अधोरेखित करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे घडविताना जिजाऊंच्या असणारे विचार आपण अंगी बाणविले पाहिजेत असा संकल्प समस्त महिलांनी व्यक्त केला . जाती धर्मापेक्षा मानवतेला महत्त्व , स्त्री पुरुष समानता आणि स्त्री सक्षमीकरणातूनच समाज सक्षम होऊ शकतो अश्या जिजाऊंच्या विचारांतून छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि एक आदर्श राज्यव्यवस्था कशी असावी याचा आदर्श घातला असे विचार संस्थेच्या खजिनदार सौ. निर्मला पाटील यांनी व्यक्त केला . तोच विचार आणि भावना घेऊन हिरोजी इंदुलकर फाउंडेशन काम करील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला .
कार्यक्रमास उपस्थित महिलांचे विचारांचे आदान प्रदान केले नंतर संस्थेच्या सचिव यांनी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या व येणाऱ्या काळात महिलां विषयक विविध स्तरावर ठोस कार्यक्रम हाती घेतला जाईल असे सांगितले . अनेक महिलांनी चर्चेत उस्फुर्त सहभाग घेऊन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले व संस्थेच्या पुढील विविध योजनांत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली .
स्वराज्याचे आद्य वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांचे नाव घेऊन काम करणारी संस्था त्याचे विचार परोपरीने जपते व जिजाऊंच्या विचारतील नारी घडविण्याचे प्रयत्न करते याबद्दल परिसरातील नागरिक संस्थेबद्दल गौरोदगार काढून समाधान व्यक्त करतात .
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना संस्थेच्या सचिव सौ. मीनाक्षी पवार यांनी देशातील प्रथम महिलांचा उल्लेख केला व त्यांना त्याकाळी किती संघर्षमय परिस्थितीतून आपला विकास करावा लागला याबद्दल माहिती दिली व त्यासर्व महिलांचे ऋण व्यक्त केले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेच्या खजिनदार सौ. निर्मला पवार यांनी भूषविले तर सूत्रसंचालन श्री. मिलिंद पवार यांनी केले .