Sunday, December 22, 2024
Homeदेशभारतीय बौद्ध सभेच्या माध्यमातून गाव तिथे शाखा अभियान राबवणार.... आगाणे

भारतीय बौद्ध सभेच्या माध्यमातून गाव तिथे शाखा अभियान राबवणार…. आगाणे

सातारा प्रतिनिधी (विकास मस्के )
भारतीय बौद्ध सभेच्या माध्यमातून विविध धम्मप्रचार आणि प्रचारासाठी उपक्रम राबवले जातात त्याच पद्धतीने सध्या सातारा जिल्ह्यामध्ये बौद्ध धम्म संदेश यात्रा आयोजित करून या माध्यमातून गाव तेथे शाखा, समता सैनिक दल बौद्धाचार्य निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव एम. एन. आगणे यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर,कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार व सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष व्ही आर थोरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यामध्ये धम्म संदेश यात्रा 2022 अभियान आयोजित करण्यात आले होते या अभियानाचा समारोप प्रसंगी आगाणे बोलत होते. गेल्या आठ दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये बौद्ध धम्म संदेश यात्रा आयोजित करण्यात आली होती या यात्रेचा समारोप सातारा येथील माता भिमाबाई स्मारक परिसरामध्ये समारोप आयोजित करण्यात आला होता यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे मुंबई प्रदेश महासचिव सुशील वाघमारे सातारा जिल्हा अध्यक्ष व्ही आर.थोरावडे यांच्यासह जिल्हा कार्यकारणी सदस्य तालुका पदाधिकारी व बौद्ध उपासक-उपासिका बहुसंख्येने उपस्थित होत्या.
आगाने पुढे बोलताना म्हणाले, भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जातात या कार्यक्रमांच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार गावोगावी झाला पाहिजे आणि या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा पूर्ण क्षमतेने काम करीत आहे येणाऱ्या भविष्य काळामध्ये गाव तिथे शाखा समता सैनिक दल आणि बौद्धाचार्य निर्माण करण्याचे काम केले जाणार असल्याचे आगाणे यांनी सांगितले.
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधील विविध 300 पेक्षा जास्त गावांमध्ये बौद्ध धम्मसंदेश यात्रा पोहोचली असून या माध्यमातून बौद्ध धम्माचे प्रचार आणि प्रसाराचे काम गतिमान केले जात आहे अकरा तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे कार्यकर्ते समता सैनिक दल आणि नागरिक यांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर येऊन बाबासाहेबांना अभिवादन करून सातारा शहरांमधून भव्य मिरवणूक काढली यावेळी सातारा शहरातील मुख्य मार्गाने ही मिरवणूक सातारा येथील माता भिमाबाई स्मारक परिसरामध्ये या रॅलीचा समारोप झाला व या ठिकाणी भव्य मेळावा घेऊन समारोप करण्यात आला.
धम्म संदेश यात्रा व रॅली यशस्वी करण्यासाठी सातारा जिल्हा कार्यकारणी मधील सर्व सदस्य अकरा तालुक्यातील तालुका अध्यक्ष सचिव व त्यांची कार्यकारणी यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील बौद्ध उपासक आणि उपासिका बहुसंख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भारतीय बौद्ध महासभेचे सातारा जिल्हा सरचिटणीस विद्याधर गायकवाड यांनी केले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments