कराड ( विकास मस्के)
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे तरुण मंडळ व बोधी फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने वैशाखी पौर्णिमा बुद्ध जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्वे तालुका कराड येथे मातंग समाजात बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला यावेळी श्रीनिवास वायदंडे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली या प्रसंगी मातंग समाज व बौद्ध समाजातील उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळाच्या वतीने मसाला दुधाचे वाटप करण्यात आले
कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना नितीन वायदंडे यांनी बुद्धांनी सांगितलेला शांततेचा विचार आपल्याला दुःखातून मुक्त करू शकतो मनुष्याने भूतकाळात व भविष्यात न जगता वर्तमानकाळात जगले पाहिजे, लोकांनी बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब केला तर जीवनात माणूस दुःखी न राहता आपली प्रगती साधून आयुष्यभर आनंदी राहू शकतो बुद्धांचे विचार सर्व समाजात शांतता प्रस्तापित करण्याचे काम करतात असे मत व्यक्त केले तसेच विपश्यना संदर्भातही बहुमोल मार्गदर्शन केले
बोधी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास मस्के यांनी बुद्धधम्म विज्ञानावर आधारित असून येथे कर्मकांड, अंधश्रद्धा, त्याला थारा नाही जगाला बुद्धाचा विचारच तारू शकतो असे मत व्यक्त केले. यावेळी विजय वायदंडे यांनी आभार मानले या कार्यक्रमात जयवंत सकटे, प्रकाश वायदंडे, संजीव वायदंडे, राहुल वायदंडे, निलेश वायदंडे ,मनोज मस्के ,सुरज वायदंडे ,राजेंद्र माने ,शुभम रसाळ, सुरज मस्के, अजय वायदंडे रुक्मिणी वायदंडे ,मंगल वायदंडे ,अविनाश वायदंडे,तसेच समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते