Monday, December 23, 2024
Homeदेश*सौंदर्याच्या बाबतीत ऐश्वर्या, सुष्मिताला द्यायची टक्कर; तीच अभिनेत्री आता बनली बौद्ध भिक्षु*

*सौंदर्याच्या बाबतीत ऐश्वर्या, सुष्मिताला द्यायची टक्कर; तीच अभिनेत्री आता बनली बौद्ध भिक्षु*

(वरिष्ठ पत्रकार-लक्ष्मण रोकडे)

स्वाती वेमूल, 1994 मध्ये पार पडलेल्या मिस इंडिया सौंदर्यस्पर्धेत ती सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत अंतिम फेरीत पोहोचली होती. यशस्वी मॉडेल बनल्यानंतर बरखाने 1996 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘खिलाडीयों का खिलाडी’ या चित्रपटातून तिने अभिनयाची सुरुवात केली.

ग्यालटेन सामटेन (Gyalten Samten) हे नाव तुम्ही ऐकलं नसलं तरी बरखा मदन हे नाव नक्कीच तुमच्या परिचयाचं असेल. अक्षय कुमार आणि रेखा यांच्या ‘खिलाडीयों का खिलाडी’ या चित्रपटात तिने भूमिका साकारली होती. पहिल्याच चित्रपटातून बरखाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ती मॉडेल, अभिनेत्री आणि निर्मातीसुद्धा होती. मात्र इंडस्ट्रीतील ग्लॅमर पाहिल्यानंतर, अनुभवल्यानंतर बरखाने स्वत:साठी वेगळीच वाट निवडली.

ग्लॅमर, कोट्यवधींची संपत्ती सोडून बरखा मदन बौद्ध भिक्षु झाली. त्यानंतर तिने तिचं नाव बदलून Gyalten Samten असं ठेवलं. बरखाचा जन्म पंजाबी कुटुंबात झाला.

1994 मध्ये पार पडलेल्या मिस इंडिया सौंदर्यस्पर्धेत ती सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत अंतिम फेरीत पोहोचली होती. यशस्वी मॉडेल बनल्यानंतर बरखाने 1996 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘खिलाडीयों का खिलाडी’ या चित्रपटातून तिने अभिनयाची सुरुवात केली.

पहिल्या चित्रपटानंतर बरखाकडे बरेच ऑफर्स होते. मात्र तिने परदेशी चित्रपटांमध्ये काम करायचा निर्णय घेतला. इंडो-डच चित्रपट ड्रायव्हिंग मिस पालमेनमध्ये तिने भूमिका साकारली. 2000 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

बरखाने याविषयी सांगितलं होतं की तिच्या आयुष्यात सर्वकाही ठीक चालू होतं. मात्र त्यात काहीतरी कमतरता असल्याची जाणीव तिला झाली. आईवडिलांना याविषयी सांगितल्यानंतर त्यांनीसुद्धा बरखाला पाठिंबा दिला.

2003 मध्ये ती राम गोपाल वर्माच्या ‘भूत’ या चित्रपटात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटातील भूताच्या भूमिकेसाठी तिचं कौतुक झालं. बरखाने चित्रपटांसोबतच मालिकांमध्येही काम केलं. तिने जवळपास 20 मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

बरखा बौद्ध धर्माच्या विचारांनी फार प्रभावित झाली होती. ती दलाई लामा यांची फॉलोअर आहे. 2012 मध्ये तिने बौद्ध भिक्षु बनण्याचा निर्णय घेतला.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments