कराड,:-
महाराष्ट्र राज्य विधिसेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई व कराड जिल्हा सत्र न्यायालय कराड आणि कराड तालुका विधी सेवा समिती कराड यांच्या संयुक्त विद्यमानाने उंब्रज येथे दिनांक 30 8 2023 रोजी फिरते विधी सेवा केंद्र मोबाईल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी निवृत्त मा. न्यायमूर्ती बी.डी. खटावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले फिरते लोक अदालती मध्ये दिनांक 30 8 2013 रोजी दोन दावे निकाली काढण्यात आले त्यामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास व पक्षकारांमध्ये न्यायालयाद्वारे त्वरित समेट व निर्णय प्राप्त झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले तसेच दिनांक 31 8 2023 रोजी विधी सेवा समिती कराड तालुका यांच्यामार्फत उंब्रज येथील ग्रामपंचायत इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये विधी साक्षरतेचे शिबिर आयोजन करण्यात आले होते
याप्रसंगी मा. निवृत्ती न्यायमूर्ती बी.डी. खटावकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला कौटुंबिक हिंसाचार कायदा, कलम 138 धनादेश अनादर कायदा व सातबारा नोंदी व फेरफार मधील त्रुटी आणि लोकांमधील गैरसमज व प्रत्यक्ष कायदे याविषयी प्रबोधन करण्यात आले
याप्रसंगी अँड. प्रतिभा महेश सूर्यवंशी कराड तालुका विधिसेवा समितीचे विधीज्ञ यांनी सातबारा व त्यासंबंधीचे कायदे एडवोकेट विशाल बामणे यांनी महिला कौटुंबिक हिंसाचार कायदा व अँड. सुमित राऊत यांनी 138 धनादेश अनादर कायदा यावर सविस्तर रित्या मार्गदर्शन केले या शिबिरास उंब्रज ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामस्थ व अंगणवाडी सेविका तसेच आशा सेविका आणि महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आणि कर्मचारी उपस्थित होते
मा. निवृत्त न्यायाधीश पी.डी. खटावकर यांनी सायबर क्राईम व खोटे फौजदारी आणि दिवाणी दावे दाखल केल्यास होणारी कायदेशीर शिक्षा तसेच वंचितांना मोफत न्याय उपलब्धता सुविधांचे प्रबोधन करून आभार व्यक्त केले याप्रसंगी विधी सेवा समन्वय किशोर जाधव व बोधी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास मस्के यांची विशेष उपस्थिती राहिली