वरिष्ठ प्रतिनिधी मूकनायक लक्ष्मण रोकडे पिंपरी चिंचवड
२३ऑगस्ट २०२३ भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान-3ची मोहीम यशस्वी झाली. चांद्रयानातील विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग केली. यामुळे चंद्रावर लँडिंग करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. तर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे.
चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर चांद्रयान-3 ने पहिला संदेश पाठवला आहे. “मी यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचलो आहे, आणि माझ्यासोबत संपूर्ण भारत देश याठिकाणी पोहोचला आहे”; अशा आशयाचा संदेश चांद्रयानातील विक्रम लँडरने पाठवला आहे. इस्रोने पोस्ट करत याबाबत माहिती ट्विट करून दिली आहे.
चांद्रयानाच्या यशानंतर संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण आहे. भारताबरोबरच जगातील विविध देशात अगदी पाकिस्तानात देखिल हा ऐतिहासिक क्षण हर्षउल्हासात, जल्लोश करत साजरा करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण आफ्रिकेतून ‘चांद्रयान-3’ च्या यशस्वी लँडिंगचं थेट प्रक्षेपण पाहिलं. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्यांनी इस्रो, टीम चांद्रयान आणि देशातील सर्व नागरिकांना व्हिडिओ काॅन्फरेसिंग द्वारे शुभेच्छा दिल्या. या क्षणासाठी कित्येक वर्षे, वैज्ञानिकांनी व इतर सहकार्यांनी अविरत मेहनत केली आहे. त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो; असं पंतप्रधान म्हणाले. चांद्रयान-3 मधील लँडर मॉड्यूल हे यशस्वीपणे
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आहे. यानंतर चंद्रावर लँड
होणारा भारत चौथा देश ठरला आहे. तर, चंद्राच्या
दक्षिण ध्रुवाजवळ लँड होणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. विक्रम लँडर हे चंद्रापासून 7.4 किलोमीटर
उंचीवरून आणखी खाली नेऊन 6.8 किमी उंचीवर
नेण्यात येईल. हा टप्पा केवळ काही सेकंदांचा असणार
आहे. इस्रोच्या मिशन कंट्रोलने लँडर मॉड्यूलला पॉवर डिसेंटची कमांड दिली आहे. यानंतर लँडर मॉड्यूलने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया सुरू केली होती. चार टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडेल. यातील पहिला टप्पा हा रफ ब्रेकिंग फेज असणार आहे. लँडर मॉड्यूलच्या सर्व चाचण्या पूर्ण लँडर मॉड्यूलच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत. त्यामुळे ही मोहीम देखील यशस्वीपणे पार पडली असल्याचे इस्रोने सांगीतले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला चंद्राबाबत मोलाची माहिती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लँडर मॉड्यूलने पाठवले ०४ फोटो पाठवले आहे. या संदर्भात इस्रोने ट्विट करून सांगीतले