मुकनायक प्रतिनीधी
प्रशांत सोनवणे
बारामती दि. ८ मनिपुर येथील आदिवासी महिला हत्याकांडातील आरोपीना फाशीची शिक्षा देणयाच्या मागणी करता वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्ह्याच्या वतीने गुरुवार दि १० रोजी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष राजकुमार यानी दिली,
मनिपुर राज्यात आदिवासी समाज्यातील महिलाची नग्न धिंड काढुन त्याच्या वर बलत्कार करुन त्याची सामुहिक हत्या करण्यात आली या घटनेने संपुर्ण भारतीयाची असुन महिला भगिनीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे आपल्या जमनी बिल्डरला दिल्या नाही म्हणुन दोनशे लोकाच्या जमावानी त्याची घर जाळुन टाकले त्याच्या परिवारातील लोकाना मारुन टाकले व पोलीसाच्या हातुन ओढुन त्याच्यावर अन्याय करुन मारून टाकले ही घटना देशाला काळीमा फासणारी आहे या घटनेच्या विरोधात गल्ली ते दिल्ली पर्यत आंदोलन होत असताना सरकारला घाम फुटत नाही दरम्याण सरकारने या घटने लक्ष देऊन आरोपीना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी या मागणी करता दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पुर्व विभागाच्या वतीने वंचितचे महाराष्ट्र प्रदेश उपध्याक्ष प्रा किसन चव्हाण साहेब ॲड सर्वजीत बनसोडे ,राज्य प्रवक्ते प्रियर्दशी तेंलग साहेब याच्या नेतॄवाखाली व जिल्हा व तालुका कार्यकार्णीच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक कसबा ते भिगवण चौक मार्गे तीव्र घोषणाबाजी करत प्रांतकार्यालया पर्यत मोर्चा जाणार असल्याची माहिती राजकुमार यानी दिली.