मुकनायक प्रतिनिधी
प्रशांत सोनवणे
बारामती, निष्काळजीपणा व हलगर्जीपणामुळे नवजात बाळाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शहरातील शिवानंदन हॉस्पिटलमधील डॉ तुषार गोविंद गदादे यांच्यावर अखेर बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की दि २२ डिसेंबर २०२२ रोजी पद्मिनी गोपाळ गायकवाड यांना शिवानंदन हॉस्पिटल येथील डॉ तुषार गदादे यांच्याकडे प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले,
डिलिव्हरी नॉर्मल होणार नसुन सिजर ऑपरेशनद्वारे करावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितले आणि ते बाहेर गेले , त्या नंतर सदर महिलेस प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या व क्लिष्ट पद्धतीने प्रसूती झाल्यानंतर बाळ गुदमरले,
या सर्व प्रक्रियेत डॉक्टरांचा संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे बाळांचा गुदमरून मृत्यू झाला, याबाबतची तक्रार बारामती शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली,
त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे त्री सदस्य समिती नेमुन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांनी दिले, त्री सदस्य समितीचा अहवाल आल्यानंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले, प्रसूती काळात डॉक्टर स्वतः तेथे हजर नसल्याचे आढळून आले, तसेच रुग्णालयात डॉक्टर किंवा नर्सेही उपस्थितीत नव्हते असे उपलब्ध कागदपत्रांवरून स्पष्ट होत,
असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे ,