मुकनायक प्रतिनिधी
प्रशांत सोनवणे
बारामती:- लिला ॲबियन्स, दिल्ली येथे पार पडलेल्या पदवी प्रदान कार्यक्रमात मेरीलॅड स्टेट युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्या कडुन तरुण वयातील विद्यार्थी जीवन, विद्यार्थ्यांचे अभ्यासातील एकाग्रता व दैनंदिन जीवनातील समस्या यावर सादर केलेल्या शोध प्रबंधास प्रा सुविराज कदम याना पीएचडी (डॉक्टरेट) प्रदान करण्यात आली, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सभा सदस्य अमर पटनाईक , कॅबिनेट जॉईंट सेक्रेटरी सौरभ कुमार तिवारी , डॉ रणजित कुमार सिंग आय,ए,एस , प्रथम महिला बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कमांडट तनुश्री पारिक, सिने अभिनेत्री शिवानी शर्मा, स्व्वॉशबॉल खेळातील प्रथम भारतीय एशियन ज्युनिअर चॅम्पियन रवी दिक्षित अदी उपस्थित होते, सुविराज कदम सर हे बारामती मध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून कदम क्लासेस ॲड इंटिग्रेटेड ॲकॅडमी नावाने शैक्षणिक संस्था चालवतात, शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनाशी त्याचा गेल्या पंधरा वर्षांपासून जवळचा संबंध राहिला आहे , विद्यार्थ्यांचीही वाढत्या वयामध्ये बदलणारी मानसिकता , अभ्यासाचा वाढता ताण तणाव व्यवस्थापन कौटुंबिक जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास यावर गेली सलग तीन वर्षे प्रा सुविराज कदम सर सातत्याने अभ्यास करीत होते,त्याचा शोध प्रबंध गेल्या वर्षी विद्यापीठाकडे सादर करण्यात आला होता.