मुकनायक प्रतिनिधी
प्रशांत सोनवणे
बारामती दि. २१ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बद्दल अपशब्द बोलल्याने भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस जोडे मारुन तीव्र निषेध व्यक्त केला , बारामती शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भिगवण चौक येथे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे बारामती तालुका अध्यक्ष नाना होळकर , बारामती शहराध्यक्ष जय पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते , माळेगाव साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक केशवराव जगताप, सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, नितीन शेंडे, बारामती नगरपालिकेचे माजी गटनेते सचिन सातव,माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, बाजार समितीचे सभापती सुनील पवार,माजी नगरसेवक अभिजित काळे, गणेश सोनवणे तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते,
गोपीचंद पडळकर हे जाणीवपूर्वक पवार कुटुंबियांच्या विरोधात सतत बोलत असतात ,
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते म्हणाले समाजाने दिलेल्या संधीच सोन कराण्यापेक्षा बेताल वक्तव्य करून समाजान दिलेल्या संधीची माती करण्याचे काम आपण करीत आहात त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.