मुकनायक प्रतिनिधी :-तुषार विजय गायकवाड
बारामती तालुका
सिंदखेडराजा तालुक्यातील बामखेडा या गावांमध्ये बौद्ध व सवर्ण समाजामध्ये हाणामारी झाली होती त्यात महिला भगिणीचे डोके फुटले होते, रिपब्लिकन युवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा दिलीपजी खरात साहेब यांना माहिती मिळताच पोलिस स्टेशन गाठले संबंधित विभागाच्या ठाणे अंमलदाराला विचारणा केली असता सदर ठाणे अंमलदाराने उडवाउडवीचे उत्तर देऊन दिलीपजी खरात यांना अपमानास्पद वागणूक दिली खरात याना अपमान सहन झाला नसल्याने सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात विष पिऊन स्वाताचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे सदर जातीयवादी गावगुंडां सह ठाणे अंमलदार केशव वाघ यांच्या वर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करुन निलंबित करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन बारामती शहर पोलिस निरीक्षक यांच्या मार्फत महाराष्टाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कडे मागणी केली आहे लवकरात लवकर गुन्हा दाखल न झाल्यास रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष बहुजन ह्दय सम्राट सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मा काकासाहेब खंबाळकर साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी,मा किरणजी घोंगडे साहेब महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष,मा मुजीब भाई पठाण महाराष्ट्र प्रदेश युवा संघटक , मा संजयजी देखने साहेब महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उपस्थित जिल्हा भर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे त्या वेळी रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रशांत सोनवणे , गणेश चव्हाण पुणे जिल्हा युवा अध्यक्ष, तुषार गायकवाड पुणे जिल्हा युवा निरीक्षक, रूक्मिणी ताई चव्हाण पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा दत्तात्रेय माने बारामती तालुका उपाध्यक्ष उपस्थित होते,