वरिष्ठ प्रतिनिधी मूकनायक लक्ष्मण रोकडे (पिंपरी चिंचवड)
दि. १८ ऑक्टोंबर २०२३ दोन दिलवसांन पूर्वी दि. १५ ऑक्टोंबर २०२३ रोजी या अभ्यास दौर्याचे आयोजन बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समिती द्वारा करण्यात आले होते. अनेक शतकापासून ओसाड पडलेला ऐतिहासिक वारसा म्हणजे प्राचिन बुद्ध लेण्या. अज्ञानातून न कळत झालेली अतिक्रमणे ते पुरातत्व विभागाची दुर्दशा मात्र आज महाराष्ट्रात अनेक पुण्यवान उपासकांच्या लढ्यामध्ये लोक जागे होत आहेत. आपला वारसा ओळखत आहेत. BLMAS. बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समिती द्वारा आयोजित प्रथम लेणी संवर्धक दिवंगत “पी. व्ही. मसुरे ( दादा)” व दिवंगत समीक्षा बेकुल्ले यांच्या स्मरणार्थ रविवार दि. १५ ऑक्टोंबर २०२३ रोजी कुडा बुद्ध लेणी, ता. तळा, जि. रायगड येथे सलग दुसऱ्यांदा मोफत अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यास पिंपरी चिंचवड तसेच पुणे येथून 2 मोफत गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीमसृष्टी पिंपरी येथून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून तब्बल १३० उपासक/उपासिका यांच्या समवेत १६० कि.मी. कुडा बुद्ध लेणीचा प्रवास करण्यात आला. लेणीच्या पायथ्याशी भोजन घेवून बुद्ध लेणी कडे जात असताना दोन्ही बसमधील सर्व लेणी प्रेमींनी सुंदर अशा आवाजामध्ये भीम बुद्ध गीते सादर केली.
अर्हंतांच्या पवित्र स्मृतीस पुष्प अर्पण करून मधुर वाणीत बुद्ध वंदना घेण्यात आली.
लेण्यांना बोलक करण्याचं कार्य आयु. राजू भालेराव यांनी उत्तम दिलेल्या माहिती द्वारे झाले.
वडिलोपार्जित वारसा संपन्न असणारे “दादा पी. व्ही मसुरे” यांचे चिरंजीव आयु. महायान मसुरे तसेच ताई सुजाता (मसुरे) नवघरे यांनी हा वारसा का महत्वाचा आहे आणि जतन करणे का गरजेचे आहे. या बद्दल महत्त्वाचे मार्गदर्शन केले. तसेच एकजूट बुद्ध लेणी समूहाचे आयु. सारीस डोळस आणि सूरज सोनकांबळे यांनी देखील या लेण्यांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती देऊन मोलाची कामगिरी बजावली.
महाराष्ट्रात तसेच देशात बुद्ध लेण्या, स्तूप, विहार यांची जागृती करणारे बोधिसत्व चॅनलचे सहयोगी आयु. मनोज गजभार यांनी माहिती तसेच इ.स.वी. पूर्व ०१ शतक ते इ.स.वी. सणाच्या ०४थ्या शतकातील शिलालेखांचा उलगडा सोप्या भाषेत केला. त्यांच्या सह सूरज सोनकांबळे यांनी हे लेख सोप्या भाषेत कळतील असेच वाचून दाखवले.
बोधिसत्व चॅनलचे आयु. सागर कांबळे यांनी या उप्रकमात विशेष उपस्थिती दर्शविली तसेच मार्गदर्शन केले.
याचप्रमाणे आयु. समाधान सोनवणे , अक्षय भालेराव, सुरेश वाघमारे, ज्योत्सना मोरे इत्यादी लेणी प्रेमींनी येथील अनेक शिला लेख बोलके केले.
अनेक नवीन आलेले उपासक ही माहिती पहिल्यांदा ऐकून भारावून गेले व पुढे त्यांची देखील या कार्यास दखल असेल असे मनोगत व्यक्त केले.
सदर पुणे येथून निघालेल्या बसचा प्रवास खर्च हा आयु. महायान मसुरे आणि सुजाता ताई नवघरे यांच्या मध्यातून तर पिंपरी येथून निघणाऱ्या बसचा खर्च आयु. विशाल बेकुल्ले यांच्या द्वारे करण्यात आला होता.
पिंपरी चिंचवड, पुणे, मावळ, अकोला, नागपूर, मुंबई, लातूर, बीड व गुजरात येथील लेणी प्रेमी इतिहास प्रेमी.
केंद्रीय शिक्षिका संध्या ठमके, रेखा ढेकले, बाळासाहेब रोकडे, ॲड. अशोक बडेकर, प्रा. प्रतीक मेश्राम, वामन गजभार, तानसेन देठे, अमोल सोनोने, हर्षद बडेकर, सिद्धार्थ वाघमारे, उत्तम वनशीव, रोहिणी वनशीव.
मीनाक्षी मिसाळ, लक्ष्मण गायकवाड, आप्पा कांबळे, प्रणाली वाघमारे, गायक अनिरुद्ध सूर्यवंशी, युवराज शिरसाट, भीमा गायकवाड, कवी गायक गोविंद गाडे, कोमल तुरुकमारे, प्रिया शेख, विजय पडघन, यावेळी उपस्थित होते .
या लेणी प्रेमींनी या लेण्यांच्या संवर्धनासाठी बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समितीच्या मार्फत जे काम केले जात आहे त्या कामांमध्ये सहभागी होण्याचे वचन दिले. या वेळी असंख्य लेणी प्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन ।बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समितीचे” आयु. रवी कांबळे, आयु. राजू भालेराव, आयु. महायान मसुरे, आयु. सुजाताताई नवघरे, आयु. सिद्धार्थ मसुरे, आयु. बळीराम गायकवाड यांनी उत्तम प्रकारे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असे लेणी प्रेमी इतिहास प्रेमी बोधिसत्व चॅनल सहयोगी
मनोज गजभार यांनी सांगीतले.