Sunday, December 22, 2024
Homeबारामतीबारामती बस स्थानकाच्या आगार प्रमुख तांबे मॅडम व कानडे साहेब यांच्या वर...

बारामती बस स्थानकाच्या आगार प्रमुख तांबे मॅडम व कानडे साहेब यांच्या वर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी, पुणे जिल्हा अध्यक्ष आनंदजी बगाडे साहेब.

मुकनायक प्रतिनिधी
विजय बगाडे

बारामती बस स्थानक हे इमान वर्ग ६ ब म्हणजे महार वतनी जागेवर उभे आहे, त्या बस स्थानकास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हा महासचिव प्रशांत सोनवणे व त्यांचे सहकारी हे गेल्या पंधरा वर्षांपासून करत आहेत या पंधरा वर्षांच्या काळात महाराष्ट्र शासन व बारामतीचे लोक प्रतिनिधीचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलने केली आहेत, दि १४ एप्रिल २०२३ रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष बहुजन ह्दय सम्राट सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी बारामती बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बस स्थानक बारामती असा फलक लावला आहे, त्या नंतर बारामती चे लोकप्रतिनिधी अजित पवार यांच्या बरोबर नामांतराच्या विषयावर रिपब्लिकन सेनेच्या शिष्ट मंडळा बरोबर चर्चा झाली
चर्चे मध्ये अजित पवार यांच्या कडुन उडवाउडवीची उत्तरं मिळाल्याने रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रशांत सोनवणे व गणेश चव्हाण यांनी
दि २१/१०/२०२३ रोजी सकाळी सात वाजता बारामती बस स्थानकाच्या मुख्य भिंती वर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बस स्थानक बारामती असा फलक लावलेला आहे, बारामती बस स्थानकाच्या आगार प्रमुख तांबे मॅडम,व कानडे साहेब यांनी बारामती चे लोकप्रतिनिधी यांच्या दबावाखाली बारामती शहर पोलिस स्टेशन मध्ये आमच्या पक्षाचे पुणे जिल्हा महासचिव प्रशांत सोनवणे,व गणेश चव्हाण पुणे जिल्हा युवा अध्यक्ष यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,तो गुन्हा मागे घेण्या बाबत आज दि २३रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल साहेब रमेश बैसजी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व बारामती चे तहसीलदार गणेश शिंदे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे साहेब बारामती शहर पोलिस निरीक्षक दिनेश तायडे साहेब यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे, तसेच ज्या कोणी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बस स्थानक बारामती फलक काढला आहे त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष बहुजन ह्दय सम्राट सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समाज भूषण मा काकासाहेब खंबाळकर साहेब व रिपब्लिकन युवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किरणजी घोंगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा अनिल साळवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे पुणे जिल्हा अध्यक्ष मा आनंदजी बगाडे साहेब यांनी दिला, त्या वेळी पुणे जिल्हा निरिक्षक मा तुषार गायकवाड, युवा नेते अविनाश कांबळे उपस्थित होते,

- Advertisment -

Most Popular

Recent Comments