मुकनायक प्रतिनिधी
गणेश चव्हाण
बारामती, आज दि. १९ रोजी बारामती बस स्थानकाच्या आंदोलना वेळी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष बहुजन ह्दय सम्राट सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी फोन द्वारे बारामती मधील समाज बांधवांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, बारामती बस स्थानक हे इमान वर्ग ६ ब म्हणजे महार वतनी जागेवर बांधण्यात आले आहे ज्या भुमी पुत्राची जमीन महाराष्ट्र शासनाने बस स्थानक बांधण्यासाठी घेतली आहे, त्या भुमी पुत्रांना एस टी महामंडळात नोकरी तसेच उद्योग व्यवसायासाठी गाळे देण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी दिला आहे, त्या वेळी रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हा महासचिव प्रशांत सोनवणे म्हणाले की बारामती बस स्थानकाचे प्रतिमात्मक नामांतर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बस स्थानक बारामती असे दि १४ एप्रिल २०२३ रोजी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष बहुजन ह्दय सम्राट सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी सात वाजता केले आहे , गेल्या पंधरा वर्षांपासून रिपब्लिकन सेनेच्या वतीने बारामती बस स्थानकाच्या मुद्यावर रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हा महासचिव प्रशांत विष्णू सोनवणे, गणेश चव्हाण पुणे जिल्हा युवा अध्यक्ष, तुषार गायकवाड पुणे जिल्हा निरिक्षक, उमेश साळवे बारामती तालुका अध्यक्ष व रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते खंबीर पणे साथ देत आहेत, तिच अपेक्षा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज बारामती मध्ये आंदोलन छेडण्यात आले मंगलदास निकाळजे व त्यांचे टीमने बारामती बस स्थानकाच्या लढ्यामध्ये सहभागी होऊन आमच्या लढ्याची ताकद वाढवली आहे त्या बद्दल आम्ही आभारी आहोत असं प्रशांत सोनवणे म्हणाले.