Sunday, December 22, 2024
Homeदौंडमागासवर्गीय विद्यार्थ्यांवर व बार्टी सारख्या प्रशासकीय संस्थेकडे महाराष्ट्र राज्य शासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर व बार्टी सारख्या प्रशासकीय संस्थेकडे महाराष्ट्र राज्य शासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

मूकनायक प्रतिनिधी: विजय बगाडे

दौंड तहसील कार्यालयासमोर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
दौंड- महाराष्ट्र राज्यात शासन निर्णयाची अंमलबजावणी न केल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे तसेच बार्टी सारख्या प्रशासकीय संस्थेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याने सामाजिक न्याय यापासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे यामुळे ऑल इंडिया पॅंथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 17/11/2023 रोजी राज्यव्यापी एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून दौंड येथील तहसील कार्यालय येथे एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले धरणे आंदोलनातील प्रमुख साहा मागण्या तात्काळ फेलोशिपबाबत घोषणा करण्यात यावी. मागण्या पुढील प्रमाणे 1) पी एच डी ला प्रवेश होऊन 20 महिने झालेले विद्यार्थी गेले 51 दिवस झाले उपोषणाला बसून आहेत याची जाणीव ठेवावं बार्टी (बी.ए.एन.आर.एफ ) कडे अर्ज केलेल्या 1)पी एच डी च्या 2022 च्या 719 संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक पासून तात्काळ सरसकट फेलोशिप द्या. 2) प्रलंबित स्वाधार व शिष्यवृत्तीची रक्कम त्वरित विद्यार्थीच्या खात्यात जमा करावी. 3) बार्टीच्या 2018 च्या 194 विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रस्ताव त्वरित मंजूर करून फेलोशिप खात्यात जमा करावी. 4) शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवणासाठी दर महिन्याला चौकशी पथक दर महिन्याला शासकीय वस्तीग्रहला भेट देण्यासाठी कमिटी गटीत करावी. 5) अनुसूचित जातीसाठी स्वतंत्र बजेट कायदा लागू करण्यात यावा.6) नॉन क्रिमिलीयरची अट अनुसूचित जातीसाठी त्वरित रद्द करण्यात यावी. प्रमुख मागण्या तात्काळ मान्य करण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील ऑल इंडिया पॅंथर सेना च्या वतीने असे निवेदनात नमूद केले आहे. सागर रामदास उबाळे दौड तालुका अध्यक्ष किरण जाधव दौंड तालुका उपाध्यक्ष मनोज साळवे दौंड शहर कार्याध्यक्ष

- Advertisment -

Most Popular

Recent Comments