वरिष्ठ प्रतिनिधी मूकनायक लक्ष्मण रोकडे पुणे
दि. ०८ नोहेंबर २०२३, ०१ जानेवारी रोजी आंबेडकरी अनुयायांकडून भिमा कोरेगांव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळा दरवर्षी मोठया प्रमाणात साजरा केला जातो. मात्र अभिवादनांसाठी येणाऱ्या अनुयायांची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात दि. ३१ डिसेंबर व १ जानेवारी या दोन दिवस साजरा केला जाणार आहे. या अनुषंगानेची संपूर्ण नियोजन जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षते खालिल प्रशासकीय समितीकडून करण्यात येत आहे.
शौर्य दिनांसाठी २० कोटी रूपयांची तरतूद करावी..
भिमाकोरेगांव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समिती यांचे मार्फत मा. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, बार्टी महासंचलक श्री. सुनिल वारे, समाजकल्याण आयुक्त मा. श्री. ओमप्रकाश बकोरिया यांचेसह अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेण्यात येऊन अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी पार्किंग, पिण्याचे पाणी, शैचालय, बस व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, यासह इतर पायाभूत सुविधा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या संपूर्ण उत्सवासाठी राज्य सरकारने यंदाच्या वर्षी २० कोटी रूपयांची तरतूद करावी अशी मागणी समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे यापुर्वीच करण्यात आली होती. तद्अनुषंगाने शौर्य दिन कार्यक्रमासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही असे अजित पवार व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी कळविले आहे.
२० लाखांच्या संख्येने अनुयायी अभिवादनासाठी येणार..
दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी अधिक भिम अनुयायी साधारणपणे २० लाखांच्या संख्येने अभिवादनासाठी येणार असून आता हा उत्सव एका दिवसात उरकने शक्य नसल्याने तसेच ज्येष्ठ नागरीक व महिला व लहान मुलांची अधिक सोयींसाठी शौर्य दिन कार्यक्रमाचे नियोजन यंदाच्या वर्षी रविवार दि. ३१ डिसेंबर सोमवार दि. १ जानेवारी असे दोन दिवस करण्यात येणार आहे. मागील वर्षी ३१ डिसेंबर रोजी साधारण दिड लाख अनुयायी अभिवादनासाठी येऊन गेल्याने यंदाच्या वर्षी ती संख्या अधिक वाढण्याची संख्या गृहित धरून नियोजन सुरू करण्यात आले आहे.
समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात येणार..
यंदाच्या वर्षी साजरा होणाऱ्या भिमा कोरेगांव विजयस्तंभ शौर्य दिन कार्यक्रमासाठी मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येणार असून शौर्य दिनांच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विशेष खबरदारी घेत असून समाज माध्यमांव्दारे पसरविली जाणारी व्देषपुर्ण अवाहने, पोस्ट व फोटोग्राफ्स यावर पुणे पोलीसाच्या सायबर क्राईम विभाग विशेष लक्ष ठेवत असून तणाव निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. तसेच नागरीकांना कोणाही आफवांना बळी न पडता उत्सहाने अभिवादनांसाठी यावे असे आश्वासन पुणे पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार व सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी समितीला दिले आहे.
“महिलांसाठी स्वतंत्र नियोजन”
महिला अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेवून त्यांच्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात येत असून जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून मागील वर्षाच्या तुलनेत अधिक चांगले नियोजन करून हिरकणी कक्षांची व आरोग्य सुविधा कक्षाची संख्या मोठया प्रमाणात वाढविली जाणार आहे.
*स्मारक दिरंगाईमुळे आंबेडकर अनुयायांमध्ये संतापाची व चिडीची भावना*
भिमा कोरेगांव विजस्तंभ येथे राज्य सरकारच्यावतीने राष्ट्रीय स्मारक सुमारे १०० कोटी रूपये खर्च करून उभरण्याचे आश्वासन सुमारे २ वर्षापुर्वी दिले होते. परंतू अद्यापपर्यंत स्मारकांच्या अनुषंगाने ठोस काम सुरू झालेले नाही. याबद्दल आंबेडकर अनुयायांमध्ये संतापाची व चिडीची भावना आहे. सरकारने नियोजित स्मारकाचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी संपूर्ण समाजाकडून होत आहे. या अनुषंगाने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन सादर करण्यात आले असून सदर अनुषंगाने लवकरच आढावा बैठक आयोजित करून स्मारकांचे काम सुरू करणेबाबत कार्यवाही करू असे आश्वासन त्यांनी दिलेले आहे. दरम्यान स्मारक समिती अध्यक्ष समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी देखील सदर स्मारकांच्या अनुषंगाने व शौर्य दिन कार्यक्रमांच्या अनुषंगाने समिती पदाधिकाऱ्यांच्या समक्ष जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून आढावा घेवून महत्वाच्या सुचना दिलेल्या आहेत.
सदर पत्रकार परिषदेव्दारे महाराष्ट्रातील व देशभरातील अभिवादनासाठी येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना शौर्य दिन कार्यक्रम दोन दिवस होत असल्याने त्यानुसार नियोजन करून अभिवादनासाठी यावे असे अव्हान करण्यात येत आहे.
सदर पत्रकार परिषदेत शौर्य दिन समन्वय सदस्याचे अध्यक्ष राहुल डंबाळे, रिपाई नेते परशुराम वाडेकर, मा. उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, मा. नगरसेवक प्रशांत म्हस्के, मा. राहुल तुपेरे, मा. सुवर्णाताई डंबाळे, सामाजिक कार्यकर्त मिलिंद अहिरे, उमेश चव्हाण, नागेश भोसले, किरण गायकवाड, सोनिया ओव्हाळ, आदि पदाधिकारी उपस्थित होते.