वरिष्ठ प्रतिनिधी मूकनायक :- लक्ष्मण रोकडे
दि. २९ डिसेंबर २०२३ राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये “काशिनाथ जगताप” यांनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळली होती. ते अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार होते. काशिनाथ जगताप यांनी विरोधकांना अनेक गोष्टींचा जाब विचारून भंडावून सोडले होते. वायसीएम मधील औषध तुटवड्या विरोधात तसेच मणिपूर अत्याचार विरोधात आंदोलन केले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू लावून धरली होती. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रकाश म्हस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष तुषार कामठे यांच्या हस्ते नियुक्ती देण्यात आली.
यावेळी काशिनाथ जगताप म्हणाले की सर्वांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी आणि विरोधकांना धक्का बसेल असे काम करणार आहे.
यावेळी जेष्ठ नेते शिरीष जाधव, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, उद्योग व्यापार सेलचे शहराध्यक्ष विजयकुमार पिरंगुटे, शहर संघटक राजू खंडागळे, सरचिटणीस अशोक तनपुरे,
विवेक विधाते, ज्योती जाधव, संजीवनी पुराणिक, शहर सचिव योगेश सोनवणे, राहुल धनवे, अविनाश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.