मूकनायक प्रतिनिधी:- विजय बगाडे
दौंड शासनाकडून स्वस्त धान्य मिळण्यासाठी काही नागरीकांनी आपल्या शिधापत्रिका विभक्त केल्या आहेत तर नागरीकांनी नविनच शिधापत्रिका काढलेल्या आहेत परंतु अशा शिधापत्रिका अधापपर्यत आॅनलाईनवर जनरेट/लाईव्ह होत नसल्यामुळे अनेक नागरिकांना शासनाकडून मिळणाऱ्या स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत तर काही नागरीकांना नविन सुरु झालेल्या आयुष्यमान योजनेचा लाभा घेता येत नाही या, शिधापत्रिका जनरेट/लाईव्ह झाल्याशिवाय नागरीकांना ना धान्य घेता येत नाही की आयुष्यमान कार्ड काढता येत नाही, केंद्र शासनाची आरोग्य योजनेचा लाभ नागरिकांना घेता येत नाही.
काही नागरीकांना वर्षभरापूर्वी शिधापत्रिका काढलेल्या असतानाही त्या अद्याप जनरेट/लाईव्ह झालेल्या नाहीत तसेच काही नागरीकांना आपल्या शिधापत्रिका आॅनलाईनवर कशा जनरेट/लाईव्ह करावयाच्या कोठे करावयाच्या याची काहीही माहिती नाही, याबाबत दौंड कार्यालयातील पुरवठा शाखेमध्ये चौकशी केली असता, तेथील कर्मचाऱ्यांकडून आज होईल उधा होईल तुमच्या संबंधीत दुकानदाराकडे जावून चौकशी करा, अशा प्रकारे उडवाउडवीची उत्तरे देतात, संबंधीत दुकानदाराकडे केली असता तेथूनही आॅनलाईन प्रक्रिया आहे,त्यात आम्ही काहीच करू शकत नाही अशा प्रकारे उत्तर मिळतातं,याचा परिणाम म्हणजे नागरीकांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेता येत नाही, एकीकडे शासन विविध प्रकारच्या योजना जाहीर करतात,अशा योजनांसाठी शिधापत्रिका नितांत आवश्यकता असते,अशा शिधापत्रिका आॅनलाईन जनरेट/लाईव्ह करण्याची सुविधा शहरांमध्ये कोठेही नाही, अशी सुविधा केंद्र दौंड शहराबाहेर पाटस येथील केंद्रावरच उपलब्ध आहे,तेथेही तहसीलदार कार्यालयातून सूचना आल्याशिवाय ते नागरिकांची शिधापत्रिका आॅनलाईन जनरेट करीत नाही याचा अर्थ असा होतो की, संबंधीत केंद्रचालक व दौंड येथील पुरवठा शाखा यांचें काहीतरी आथिर्क लागेबांधे असावे यामुळे मात्र नागरीकांची गळचेपी होत आहे,
तरी अशा शिधापत्रिका लवकरात लवकर जनरेट नाही झाल्या तर रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर यांचें वतीने आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल यामुळे होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची आपण नोंद घ्यावी असे निवेदन रिपब्लिकन सेना यांच्या वतीने देण्यात आला. रिपब्लिकन सेना पुणे उपजिल्हाध्यक्ष (पूर्व) आनंद बगाडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रिपब्लिकन सेना अनिल साळवे रिपब्लिकन सेना दौंड तालुका अध्यक्ष सचिन साळवे हर्ष आढाव दिलीप पगारे व सर्व कार्यकर्ते उपस्थित.