अमेरिका : भारताचा प्रजासत्ताक दिन जगभरात साजरा करण्यात आला. अमेरिकेतील आंबेडकर आंतरराष्ट्रीय मिशनने च्या वतीने देखील न्यू जर्सी शहरात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
न्यू जर्सी, शहरात गेल्या अनेक वर्षापासून प्रजासत्ताक दिन साजरा केला जात असून या कार्यक्रमाला अमेरिकेतील विविध भागातील आंबेडकरी कुटुंब हजेरी लावतात. याही वर्षी अनेक कुटुंबांनी हजेरी लावली होती.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रगीत गायन, भाषणे आणि देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये तरुण पिढीने दिलेली भाषणे निश्चितपणे भारताच्या राज्यघटनेची जाणीव आणि सार्वभौम भारतासाठी त्याचे महत्त्व विशद करतात. या सोहळ्याला अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि फिलाडेल्फिया भागातील असंख्य आंबेडकरी कुटुंबे हजर होती.