मूकनायक प्रतिनिधी:- विजय बगाडे
मुळ भारतीय जागृती विकास संघ पुणे यांच्या वतीने स्वाक्षरी मोहीम.
दौंड -आगामी देशातील निवडणूक. मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात ईव्हीएम मशीन बंद करा या मागणीसाठी पुणे जिल्हयासह राज्यांमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. ईव्हीएम मशिनमुळे गडबडी करून नको असलेले उमेदवार निवडून येत आहेत नुकत्याच पाच राज्याच्या निवडणूक मध्ये काही उमेदवारांना पक्षाचे व घरच्या लोकांचे किंवा स्वतःचे मत देखील प्राप्त झाले ईव्हीएम मशिनमुळे नाही जनतेमध्ये मोठा संभ्रम व शंका निर्माण झाली असून देशाच्या उज्वल भविष्याचा प्रश्न आहे लोकशाही देशामध्ये जनतेचे मत हे अंतिम असते सर्व सामान्य जनतेचे मत आहे की मशीन वर मतदान नको काँग्रेसने ईव्हीएम मशीन भारतात आणली व राज्यसभेत कायदा मंजूर करून घेतला यास सहमती स्व अटलबिहारी वाजपेयी (भाजप) यांनी दिली होती काँग्रेस भाजप सीपीआय प्रकाश खरात काँग्रेस खरात या तिन्ही पक्षांनी अनुमोदन दिले होते तरी संसदेमधील खासदारांनी राज्य सभेमध्ये ईव्हीएम मशीनच्या काळया कायद्याविरुद्ध आवाज उठविला पाहिजे ज्या देशांमध्ये ईव्हीएम मशीन तयार झाली अमेरिका जपान. इंग्लंड. फ्रान्स. जर्मनी. कॅनडा. युक्रेन. पाकिस्तान. बांगलादेश स्वीडन. ऑस्ट्रेलिया. स्पेन. या जगातील देशांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जातात तर भारतामध्ये सुद्धा बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यात याव्यात या मागणीसाठी पुणे जिल्ह्यातून ईव्हीएम मशिन हटाव लोकशाही बचाव” यासाठी हे स्वाक्षरी अभियान सुरू करीत आहोत यासाठी चारचाकी वाहन वापरात येणार असून गाव. तालुका. जिल्हा असे महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र असेल संपूर्ण राज्यात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे इव्हीएम मशीन बंद करा नाहीतर येणाऱ्या निवडणुकीवर मूळ भारतीय जागृती विकास संघ पुणे. आमचा सामूहिक बहिष्कार असेल याची मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोंद घ्यावी. असा इशारा निवेदन च्या माध्यमातून मूळ भारतीय जागृती विकास संघ पुणे. अध्यक्ष संजय अंबादास कांबळे यांनी दिला मा.तहसिलदार कार्यालय निवेदन देण्यात आले. अनेक कार्यकर्ते स्वाक्षरी केल्या.