Sunday, December 22, 2024
Homeबारामतीबारामती बस स्थानकाच्या नामांतराच्या विषयावर आद. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या बरोबर चर्चा...

बारामती बस स्थानकाच्या नामांतराच्या विषयावर आद. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या बरोबर चर्चा करुन लवकरच निर्णय घेणार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार.

*रिपब्लिकन सेनेच्या पंधरा वर्षांच्या संघर्षाला यश*

*मुकनायक* *प्रतिनिधी*
*प्रशांत* *सोनवणे*

बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे तसेच बारामती बस स्थानक ज्या लोकांच्या जागेवर बांधण्यात आले त्या भुमी पुत्रांना एस टी महामंडळात नोकरी किंवा उद्योग व्यवसायासाठी गाळे देण्यात यावे या मागणीचे निवेदन आज दि. १३ रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे देण्यात आले, त्या वेळी अजितदादा पवार म्हणाले की बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्या बाबत रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष बहुजन ह्दय सम्राट सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या बरोबर मुंबई येथे चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल, तसेच बारामती बस स्थानक ज्या लोकांच्या जागेवर बांधण्यात आले आहे त्या भुमी पुत्रांन वर अन्याय होणार नाही असे अजितदादा म्हणाले. त्या वेळी बारामती नगरीचे माजी उपनगराध्यक्ष नवनाथ (पप्पु) बल्लाळ,रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हा महासचिव प्रशांत विष्णू सोनवणे, गणेश मारुती चव्हाण पुणे जिल्हा युवा अध्यक्ष उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments