मूकनायक प्रतिनिधी:- विजय बगाडे
दौंड:- नागरिकांना शासनाकडून स्वस्त धान्य मिळण्यासाठी शासनाकडून शिधापत्रिका दिल्या जातात, नागरीकांच्या या शिधापत्रिका आता आॅन लाईन जनरेट करून संगणकीकृत करून नागरिकांना दिलेल्या धान्याची माहिती शासनाला होत असते तसेच या शिधापत्रिका आॅनलाईन जनरेट झाल्यावर विविध सवलतीच्या योजनांचा लाभ नागरीकांना शासनाकडून मिळतो
परंतु सध्या काही नागरीकांनाच्या पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेल्या शिधापत्रिका या संगणकीकृत होवून आॅनलाईन जनरेट झालेल्या आहेत परंतु काही नागरीक नविनच शिधापत्रिका काढत आहे तर काही नागरीक आपल्या कुटुंबापासून विभक्त राहातं असल्याने विभक्त शिधापत्रिका काढत आहेत अशा अनेक नागरिकांच्या शिधापत्रिका या ऑनलाईनवर जनरेट करण्यासाठी नागरीकांना मोठीं कसरत करावी लागते,अशा शिधापत्रिका आॅनलाईन जनरेट करण्यासाठी दौंड शहराबाहेर पाटस येथे एकाच खाजगी व्यक्तीकडे आपल्या कार्यालयातील पुरवठा शाखा यांनी काम सोपविले होते, त्यांचेकडून हे काम तहसील कार्यालयातून सूचना आल्याशिवाय शिधापत्रिका जनरेट जात नव्हते,
परंतु याबाबत रिपब्लिकन सेना दौंड वतीने निवेदन दिनांक २१/१२/२०२३/ रोजी आपल्याकडे तक्रारी केला असता,त्याची दखल घेवून पुरवठा शाखा दौंड येथे एक स्वतंत्र व्यक्ती शिधापत्रिका आॅनलाईन जनरेट करण्यासाठी नेमलेली आहे , दौंड शहर व लगतच्या ग्रामीण भागातील अनेक शिधापत्रिकाधारकांना आपल्या नविन काढलेल्या शिधापत्रिका आॅनलाईन जनरेट करण्यासाठी पुरवठा शाखेत यावे लागते, परंतु एकाच व्यक्तीकडून अनेक नागरिकांच्या शिधापत्रिका आॅनलाईन जनरेट करणे शक्य नाही शिवाय पुरवठा शाखेतील काही नियुक्त कर्मचारी हे हंगामी स्वरूपाचे असून त्याचेकडून नागरीकांना अरेरावीची भाषा वापरली जाते, नागरिकांना सौहार्दापूर्वक वागणूक दिली जात नाही, त्यामुळे नागरीकांची कामे वेळेवर होत नाही
केंद्र शासनाकडून सुरू असलेल्या आयुष्यमान योजनेसाठी शिधापत्रिका आॅनलाईन जनरेट होणे आवश्यक असताना नागरीकांना आयुष्यमान योजनेचा लाभा घेता येत नाही व शिधापत्रिका जनरेट/लाईव्ह झाल्याशिवाय नागरीकांना ना धान्य घेता येत नाही की आयुष्यमान कार्ड काढता येते नाही
नागरीकांच्या शिधापत्रिका आॅनलाईन जनरेट/लाईव्ह झालीं तरी स्वस्त धान्य दुकानदारांकडून वेळेत धान्य पुरवठा केला जात नाही, किंवा धान्य घेण्यास नागरीक स्वस्त धान्य दुकानला गेले असता दुकानदार दुकानावर हजर नसतात, हजर असले तर आज धान्य नाही, उधा या परवा या असे म्हणत स्वस्त धान्य दुकानदारांकडून टाळाटाळ केली जाते, काही वेळेस काही नागरीकांच्या नावांवर असलेले धान्य इतरांना दिले जाते व धान्य संपले, असे नागरिकांना सांगितले जाते थोडक्यात नागरिकांना देण्यात येणाऱ्या नविन शिधापत्रिका किंवा जुन्या खराब शिधापत्रिका बदलून मिळणे या प्रक्रिया लवकरात लवकर नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात नाहीत नागरीकांची नांवे धान्य वितरण यादीमध्ये समाविष्ट करून त्यांना लवकरात लवकर धान्य वाटप प्रकिया अंमलात आणली जात नाही, स्वस्त धान्य दुकानदारांकडून तसेच पुरवठा शाखेतील तात्पुरत्या/हंगामी स्वरूपांत नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडून नागरीकांची होणारी अवहेलना केली जाते, तसेच सेतु कार्यालयातून मिळणारे उत्पन्न दाखले, जातींचे दाखले नागरिकांना वेळेवर दिलें जात नाही या सर्व बाबीबाबत वारंवार सुचना निवेदन देवुन सुध्दा तहसिल कार्यालयाकडून कांहीही कार्यवाही केली जात नाही, त्यामुळे आम्हास नाविलाजास्तव पुन्हा आवाज उठवावा लागत आहे ,
तरी वरील नमूद समस्या दूर होण्यासाठी रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांचें वतीने आपल्या कार्यालयासमोर दि,८/ जानेवारी/ २०२४/ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, यामुळे परिणामांची सर्वस्वी जबाबदारी ही आपणावर राहील, याची कृपया आपण नोंद घ्यावी, असा इशारा रिपब्लिकन सेना च्या वतीने देण्यात आला. पुणे जिल्हा उपाध्यक्ष (पूर्व) आनंदजी बगाडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिलजी साळवे दौंड तालुका अध्यक्ष सचिन साळवे दौंड तालुका सल्लागार दिलीप पगारे दौंड युवकशहर अध्यक्ष हर्ष आढाव.