मूकनायक प्रतिनिधी :-विजय बगाडे
बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे तसेच बारामती बस स्थानक ज्या लोकांच्या जागेवर बांधण्यात आले आहे, त्या भुमी पुत्रांना एस टी महामंडळात नोकरी किंवा उद्योग व्यवसायासाठी गाळे मिळावे म्हणून,
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बारामती बस स्थानक नामांतर संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा सागरजी डबरासे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारा शेजारी गेल्या पाच दिवसांपासून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बारामती बस स्थानक नामांतर संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी आमरण उपोषणाला बसले आहेत,अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष गणेश चव्हाण यांनी दिली त्या वेळी मूकनायक प्रतिनिधींशी बोलताना प्रदेश महासचिव प्रशांत सोनवणे म्हणाले की बारामती बस स्थानक हे इमान वर्ग ६ ब म्हणजे महार वतनी जागेवर बांधण्यात आले आहे, त्या मुळे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे तसेच बारामती बस स्थानक ज्या लोकांच्या जागेवर बांधण्यात आले आहे, त्या भुमी पुत्रांना एस टी महामंडळात नोकरी किंवा उद्योग व्यवसायासाठी गाळे मिळावेत यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करत आहोत, दि १० फेब्रुवारी पासून आमचे आमरण उपोषण सुरू आहे अद्याप पर्यंत आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही जर दोन दिवसांत आमची दखल न घेतल्यास, आम्ही तीव्र आंदोलन करु असे सोनवणे म्हणाले, त्या वेळी संघर्ष कृती समितीचे सौ कांचन साक्षर भोसले प महाराष्ट्र अध्यक्षा, तुषार गायकवाड प्रदेश कार्य अध्यक्ष,पुणे जिल्हा महासचिव शिकिदा भोसले, बारामती तालुका अध्यक्ष दत्तात्रय माने, महेबुब सय्यद बारामती शहर उपाध्यक्ष, व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.