मुकनायक प्रतिनिधी:-विजय बगाडे
बारामती दि. २ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते विविध वास्तुचे लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने बारामती येथे उपस्थित होते, परंतु बारामती बस स्थानकाचे उद्घाटन त्यांना ऑनलाईन करावे लागले, कारण बारामती बस स्थानक हे इमान वर्ग ६ ब म्हणजे महार वतनी जागेवर बांधण्यात आले आहे, त्या मुळे रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्ही गेल्या पंधरा ते सोळा वर्षांपासून बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी करत आहोत परंतु महाराष्ट्र शासन व बारामतीचे लोक प्रतिनिधी यांनी आमच्या मागणी कडे दुर्लक्ष केल्याने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष बहुजन ह्दय सम्राट सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही दि १४ एप्रिल २०२३ रोजी बारामती बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बस स्थानक बारामती असा प्रतिमात्मक नामांतर केलेला फलक लावण्यात आला, तसेच दि २१ ऑक्टोंबर २०२३ रोजी बारामती बस स्थानकाच्या मुख्य भिंती वर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बस स्थानक बारामती प्रतिमात्मक नामांतर केलेला फलक लावण्यात आल्याने , तसेच दि १० फेब्रुवारी २०२४ ते १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत बारामती बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारा शेजारी आमरण उपोषण त्या नंतर दि २८ फेब्रुवारी २०२४ रोजी पुन्हा आमरण उपोषणाला आम्ही बसलो होतो परंतु पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी बारामती बस स्थानकाच्या कामांची पाहणी करण्यासाठी बारामती मध्ये आले असताना बारामती शहर पोलिसांनी दडपशाही पद्धतीने आमचे आमरण उपोषण थांबवले, अशी माहिती रिपब्लिकन युवा सेनेचे पुणे जिल्हा महासचिव प्रशांत सोनवणे व पुणे जिल्हा युवा अध्यक्ष गणेश चव्हाण यांनी दिली, त्या वेळी रिपब्लिकन युवती पुणे जिल्हा अध्यक्षा सौ रुक्मिणीताई चव्हाण, बारामती तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय माने, बारामती तालुका महासचिव शिकिदा भोसले, बारामती शहर उपाध्यक्ष महिबुब सय्यद, तसेच बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते,