ःडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची स्वायत्त संस्था प्रकल्पाधिकारी सिद्धार्थ गोवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत मिलिंद आळणे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराज रणवीर होते. यांनी शाहू महाराजांच्या जीवनावर अनेक पहिलू उजळून सांगणे तसेच सामाजिक लोकशाही निर्माण करायचे असेल तर त्यासाठी सामाजिक समता व सामाजिक न्याय प्रस्थापित होणे गरजेचे असल्याचे विचार शाहू महाराजांचे होते .छत्रपती शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा ,आंतरजातीय विवाह कायदा ,घटस्फोटाचा व वारसा हक्काचा कायदा, देवदासी प्रथा प्रतिबंधक कायदा ,स्त्रियांच्या संरक्षणाचा कायदा ,असे कायदे केले सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50 टक्के आरक्षण शेतीतील विविध अभिनव प्रयोग, प्राथमिक शिक्षणाची अंमलबजावणी केली व सक्तीचे केले ,छत्रपती शाहू महाराजांना वस्तीगृहाचे जनक सुद्धा म्हटले जाते. यावेळी प्रणव आळणे, प्रेमा वगर, आयुष्यी रणवीर ,रतन वघर ,आराधना आळणे ,रोशनी गायकवाड ,संस्कृती आळणे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते