बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ. सुनेत्रा अजित दादा पवार यांना जाहीर पाठिंबा
मूकनायक प्रतिनिधी
विजय बगाडे
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा पवार गटचे ) उमेदवार सौ. सुनेत्रा अजितदादा पवार यांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बारामती बस स्थानक नामांतर संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने बारामती येथे आज दि ५ मे २०२४ रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सौ सुनेत्रा अजितदादा पवार यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते मा पार्थ पवार यांच्या कडे पाठिंब्याचे पत्र देण्यात आले त्या वेळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बारामती बस स्थानक नामांतर संघर्ष कृती समितीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव मा प्रशांत विष्णू सोनवणे, प्रदेश कार्य अध्यक्ष मा तुषार विजय गायकवाड,माळेगाव शहराध्यक्ष मा विठ्ठल सोनवणे, बारामती शहर उपाध्यक्ष मा महिबुबभाई सय्यद व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संघर्ष कृती समितीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रशांतजी सोनवणे यांनी माहिती दिली