Sunday, December 22, 2024
Homeदौंडभारतीय बौद्ध महासभा दौंड शहर शाखा वर्षावास उद्घघाटन संप‌न्न.

भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर शाखा वर्षावास उद्घघाटन संप‌न्न.

दौंड- मूकनायक प्रतिनिधी
विजय मधुकर
बौद्ध धम्मात आषाढ पौर्णिमा व वर्षावासचे फार मोठे महत्व आहेत,
जगात आषाढी पौर्णिमा सर्वात मोठा सण व आनंद
उत्सव म्हणून साजरा केला जातो, कारण याच दिनी तथागत भगवान गौतम बुद्धांनी समस्त मानवाला अविद्येच्य अज्ञान
अंध:करातून मुक्त करणारे आणि प्रज्ञेच्या प्रकाशमध्ये
आणणारे ज्ञान उपदेशिले
यासोबतच आषाढ पौर्णिमेचे
इतरही अनेक महत्त्व आहेत
याच निमित्ताने दौंड मध्ये *भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर शाखा वर्षावास कार्यक्रम दौंड शहराध्यक्ष आयु.बी. वाय.जगताप यांचे अध्यक्षतेखाली प्रा.डॉ .भीमराव मोरे यांचे बुद्धप्रणाली निवास येथे दि.२५.७.२०२४ रोजी सायं.६.ते ८.या वेळेत संपन्न झाला. यावेळी भगवान गौतम बुद्ध ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली सूत्तपटण आयु.श्रीधर बाळेकुंद्री (उपाध्यक्ष संस्कार )यांनी केले. प्रास्ताविक आयु.विजयराव गायकवाड यांनी केले. वर्षावास कार्यक्रमाचे उदघाटन सागरबाई ओहळ यांचे हस्ते झाले. , “वर्षावास व आषाढी पौर्णिमा” या विषयावर सरचिटणीस प्रा. डॉ. भिमराव मोरे यांनी सुंदर प्रवचन दिले. या प्रसंगी आयु.अरुण ओहळ,बी. वाय.धीवर यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विलास कदम, सूर्यकांत जानराव, सुरेश मोरे, हरिबा काळे, सूर्यकांत कांबळे, दिलीप आढाव, गोरख घोडके, सैदाप्पा गायकवाड, राजू कांबळे, अरुण मोरे,एडवोकेट शितल मोरे ,संगीता मोरे, शिल्पा कांबळे, सीमा मोरे, लक्ष्मीबाई मोरे, सुरभी मोरे, बंटी ओहळ इ.मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयराव गायकवाड यांनी केले तर आभार बी. वाय. धीवर यांनी मानले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments