Sunday, December 22, 2024
Homeदौंडलिप्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारा आरोपी दौंड पोलीस स्टेशन गुन्हे, शोध पथका...

लिप्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारा आरोपी दौंड पोलीस स्टेशन गुन्हे, शोध पथका कडून २४, तासात जेरबंद


मूकनायक दौंड प्रतिनिधी विजय बगाडे
दौंड:- पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक १७/७/२०२४
रोजी रात्री ८.३० वाचे सुमारास दौंड गावच्या हाती नगर मोरे चौकात मध्ये महिला ऋतुजा निलकंठ पुकळे रा. संभाजीनगर,जि.
संभाजीनगर हया एस.टी. बसची वाट पाहत असताना एक पांढऱ्या रंगाची चार चाकी वाहन येऊन एक अनोळखी इसम सदर महीले
जवळ येऊन कुठे जायचे आहे, अशी विचारणा करून मी नगरला चाललो आहे, मी तुम्हाला सोडतो असे म्हणून कार मध्ये बसवुन मौजे दौंड
गावचे हद्दीत असलेले सोनवडी नदीच्या पुलाजवळ कार थांबवुन सदर महेश दमदाटी करून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने हिसकावुन तसेच तिचे कडे असलेली बॅग घेऊन तिला सदर रस्त्यावरच अंधारात या ठिकाणी सोडून निघून गेल्याबाबतचा दौंड पोलीस स्टेशन गुरंन ५२८/२०२४ भारतीय न्याय सहिता सन
२०२३ चे कलम ३०९(४), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने, पोनि
संतोष डोके सो यांनी डि.बी पथकास गुन्ह्याचे अनुषंगाने सूचना दिल्या त्यावेळी लागलीच एक टीम तयार करून गुन्हा घडला ठिकाणचा सी.सी.टी.व्ही फुटेजचा तसेच गोपनिय बातमीदारचे आधारे अज्ञात वाहनाच्या व आरोपीचा शोध घेतला असता सदरचा गुन्हा हा प्रफुल्ल उर्फ बंटु प्रकाश पानसरे वय वर्षे २८ रा.पाटस ता.दौंड जि. पुणे याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून सादर आरोपी हा त्याच्या त्यास मौजे वरवंड चौकात येथे येणार असल्याचे समजल्याने डि.बी पथकाने सापळा रचून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह ताब्यात घेऊन अटक करण्यात आरोपीकडून गुन्ह्यात चोरलेली सोन्याची चैन व गुन्ह्यात वापरलेली कार असे एकूण ५ लाख ५० हजार हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर
गुन्हयातील आरोपीस अटक करून त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने प्राथमिक तपास केला आरोपीकडून पुणे जिल्हा हददी आशा प्रकारे गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता आहे
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो. अप्पर पोलीस संजय जाधव सो , उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि
संतोष डोके सो, मपोसई सुप्रिया दुरंदे पोहवा.सुभाष राउत, नितीन बोराडे, पांडुरंग थोरात, शरद वारे, पोना.अमीर शेख,पोशि. अमोल देवकाते, रवींद्र काळे, योगेश गोलांडे यांनी केली सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास मपोसई सुप्रिया दुरंदे या करीत आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments