मूकनायक प्रतिनिधी: -विजय बगाडे
दौंड: 26 जून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन निमित्त विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे दुष्परिणाम या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले तरुणाई मध्ये वाढत चाललेले अमली पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण ही एक गंभीर चिंतेची बाब आज बनली आहे असे प्रतिपादन दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष ढोके यांनी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शेठ जोतिप्रसाद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या अमली पदार्थ विरोधी दिन कार्यक्रमाप्रसंगी केले अमली पदार्था च्या सेवनाने आजच्या तरुण पिढीचे जीवन उध्वस्त होत असून त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत आहे समवयस्क मित्रांच्या संगतीत व दबावामुळे अमली पदार्थ सेवनाला ही तरुणाई बळी पडत आहे त्यामुळे वेळीच सावध होण्याचा सल्ला पोलीस निरीक्षक संतोष ढोके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला आपले वय हे यशाची उत्तुंग शिखरे पार करण्याचे असून या वयात अमली पदार्थ सेवनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांची स्वप्ने, धुळीस मिळत असून कुटुंब उध्वस्त होत आहेत अमली पदार्थांच्या सेवनामुळे नैराश्य येऊन अनेक विद्यार्थी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांनी अमली पदार्थांपासून दूर रहावे व आपल्या पालकांची स्वप्न पूर्ण करावीत तसेच रोडरोमिओ व टवळखोरांची गय केली जाणार नाही त्यांनी सावध रहावे असे सांगून विद्यार्थ्यांच्या भावी शैक्षणिक जीवनास पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी शुभेच्छा दिल्या उपनिरीक्षक सतीश राऊत म्हणाले की विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ सेवनापासून दूर राहून व्यायाम करून आपले शरीर सशक्त बनवावे व आपण आपल्या पालकांची स्वप्न पूर्ण करावीत या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दूरंदे शेठ जोतिप्रसाद विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रमोद काकडे, उपप्राचार्य श्रीकृष्ण देवकर सेवाजेष्ठ उपशिक्षक दत्तात्रय शिंदे, शिवराज शितोळे,स्व कि. गु. कटारिया महाविद्यालयाचे श्रीकृष्ण ननवरे,विशाल ओव्हाळ, उपशिक्षिका सुरेखा थोरात, दिलीप शिंपी विशाल ओव्हाळ आदी मान्यवर व इयत्ता 12 वी चे विध्यार्थी उपस्थित होते.