महापालिका कर्मचार्यांकडून कचरा उचलण्यासाठी मागीतली जाते लाच..
भोसरी एमआयडीसीतील लाखो कामगारांचे आरोग्य धोक्यात..
वरिष्ठ प्रतिनिधी लक्ष्मण रोकडे मूकनायक पिंपरी चिंचवड दि. २३ सप्टेंबर २०२४ आज एमआयडीसी परिसरात एमआयडीसीतील कचरा समस्या गंभीर बनल्यामुळे रास्ता रोको आंदोलन घेण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व “फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री अभय भोर” यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने उद्योजक आणि कामगार वर्ग उपस्थित होते . यावेळी श्री. अभय भोर यांनी महानगरपालिकेवर अनेक ताशेरे ओढले.
यावेळी कचरा रस्त्यावर फेकून कचऱ्याची होळी करण्यात आली आणि पुढील काळामध्ये सातत्याने कचरा उचलला न गेल्यास उद्योजक कचरा रस्त्यावर टाकतील हा इशारा देण्यात आला परिसरामध्ये कचऱ्याची समस्या गंभीर बनल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून कचरा रस्त्यावर टाकला तर कारवाई आणि कंपनीत ठेवला तर रोगराई ही अवस्था सध्या एमआयडीसीची झाली आहे. एमआयडीसी मध्ये उद्योजकांना कंपन्यांना खाजगी गाड्यांना पैसे देऊन कचरा देण्याची वेळ आली असून कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचून राहिल्यामुळे कामगारांच्या आरोग्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अनेक कंपन्यांमध्ये कामगारांना डेंगू मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार झाले आहेत. परंतु कंपन्यात कचरा साचू देण्यामागे नक्कीच भंगार व्यवसायिकांचा मोठा हात असून कंपन्यांमधील कचरा भंगार व्यवसायिक सुद्धा उचलत आहेत, कारण या कचऱ्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य हे मिळते आणि कदाचित या संपूर्ण प्रकरणात कुठेतरी भ्रष्टाचाराचा मोठा वास येताना दिसतो आणि याचा परिणाम कामगारांच्या कामावर झाला असून अनेक कामगार हे सातत्याने आजाराने सुट्ट्या घेतात. फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने मागणी केली आहे की परिसरात छोट्या घंटागाड्या चालू कराव्यात व प्रत्येक कंपनीचा (कंपनी छोटी असो किंवा मोठी) कचरा हा घेतला पाहिजे जेणेकरून परिसरामध्ये स्वच्छतेचे साम्राज्य निर्माण होईल परिसरात अनेक देशी-विदेशी कंपन्यांचे प्रतिनिधी येत असतात. परंतु परिसरामध्ये प्रत्येक ठिकाणी घाणीचे एवढे सामराज्य वाढले आहे की परिसरात काही ठिकाणी तर कामगार वर्गाला कंपनीत किंवा बाहेर बसून जेवताही येत नाही. गेली कित्येक वर्ष एमआयडीसी मध्ये सातत्याने स्वच्छता असायची परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये एमआयडीसीमध्ये प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे ढीग झालेले आढळून येतात महानगरपालिकेने कचरा स्वच्छतेसाठी ब्रँड अँबेसिडर नेमले असून या ब्रँड अँबेसिडरच एमआयडीसी कडे लक्षच नसल्याचे दिसून येते कुठेतरी शासन उद्योजकांचा पैसा फक्त लुबाडणे चालू असून हा प्रकार थांबला पाहिजे अन्यथा येथील कंपन्यांना सातत्याने तीव्रतेचे आंदोलन उपोषणे हा मार्ग पत्करल्याशिवाय राहणार नाही. असे अध्यक्ष श्री. अभय भोर यांनी आज झालेल्या आंदोलणादरम्यान सांगीतले. यावेळी अनेक उद्योजकांनी आपले विचार व्यक्त केले आणि महानगरपालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी अध्यक्ष श्री. अभय भोर, उद्योजक श्री. जसबिंदर सिंग, श्री. मिलिंद काळे, श्री. प्रवीण चव्हाण, श्री. कृष्णा वाळके, श्री. सचिन भगत, श्री. राहुल गरड, श्री. नितीन शिर्के, श्री. अमोल स्वामी, श्री. इसाक पठाण, उद्योजिका दुर्गा भोर, जयश्री साळुंखे आणि अनेक उद्योजक अनेक कामगार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.