वरिष्ठ पत्रकार मूकनायक पिंपरी चिंचवड दि.१२ सप्टेंबर २०२४ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भीमसृष्टी पिंपरी या ठिकाणच्या मागील भूखंडावर त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकाचे प्रलंबित काम तातडीने मार्गी लावण्याकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासक श्री. शेखर सिंह यांची मनपा भवनात त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक कृती समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा करण्यात आली. या बैठकीत आयुक्त शेखर सिंह यांनी या स्मारकाच्या संदर्भात समाजबांधवांच्या भावना लक्षात घेऊन स्मारक लवकरात लवकर होण्यासाठी सदरच्या जागे संदर्भात येत्या पंधरा दिवसात पीएमपीएमएलच्या अध्यक्षा दिपा मुधोळ व महानगरपालिका तसेच स्मारक कृती समिती व समाजबांधव यांची संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याचे आश्वासन दिले.
या बैठकीत बोलताना मानवदादा कांबळे यांनी या प्रकल्पातील त्यागमूर्ती माता रमाईचा पुतळा पूर्ण झाला असून तो बसविण्याकरिता यामधील तांत्रिक अडचणी दूर करून त्यागमूर्ती माता रमाई स्मारक कामाला गती द्यावी अशी मागणी केली.
या प्रसंगी जेष्ठ समाजसेवक मानवदादा कांबळे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, बापूसाहेब गायकवाड, गिरीष वाघमारे, नरेंद्र बनसोडे, महायान मसुरे, मनोज गजभार, संतोष जोगदंड, प्रकाश बुक्तर, रामचंद्र आचलकर, राधाकांत कांबळे, विजय सरतापे उपस्थित होते. याप्रसंगी आयुक्त शेखर सिंह यांना त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक कृती समितीच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली.