Monday, December 23, 2024
Homeदौंड‍दौंड, बारामती एम.आय.डी.सी . एसटी* बस सुरू करावी* अन्यथा डॉबाबासाहेब आंबेडकर जयंती...

‍दौंड, बारामती एम.आय.डी.सी . एसटी* बस सुरू करावी* अन्यथा डॉबाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीकडून ‌‌ रास्ता रोको आंदोलनाचा इशार* ****

दौंड-मूकनायक प्रतिनिधी विजय बगाडे दौंड शहर व तालुक्यातून अनेक महिला काम निमित्त व विद्यार्थी – विद्यार्थिनी दौंड वरून बारामती या ठिकाणी शिक्षणासाठी एसटी बसने प्रवास करतात एस.टी बसने शैक्षणिक कामे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे वेळेवर बस सुटत नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो बारामती येथून शिक्षणासाठी रेल्वेची वेळ गैरसोयीची असल्याने एसटी बसने
प्राधान्याने प्रवास करावा लागतो यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनीसह अनेक महिलाही बारामती एम. आय. डी. सी. मध्ये कामानिमित्त एस टी बसने प्रवास करतात.
दौंड ते बारामती दरम्यान दौंड सकाळी ६:०० वा. पहिली बस सुटते व सायंकाळी दौंड डेपोची बस बारामती वरून ७:३०वा. सुटण्याची वेळ आहे दौंडहून बारामतीस जाण्यासाठी अनेक बसेस असल्याने बारामती येथे जाण्यास विद्यार्थ्यांना वेळेचा काहीसा त्रास नाही. परंतु एम. आय. डी. सी. मार्गे एखादी बस चालू करणे आवश्यक आहे. बारामती वरून विद्यार्थी विशेषता विद्यार्थिनीना सायंकाळी परत दौंडला येण्यासाठी ७:३० वाजताच्या बस शिवाय दुसरी बस नाही ७:३० वाजताच्या आधी दौंडला येणार आहे बसेस या लॉंगरूट च्या एक्सप्रेस बसेस असतात अशा बसेस मधून प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्याने विद्यार्थिनींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते तसेच काही वेळेस अशा एक्सप्रेस बसेस मध्ये पास धारक विद्यार्थ्यांना व कर्मचारी महिलांना मनाई केली जाते तसेच ७:३० वा. सुटणारी बस ही काही वेळेस उशिरा सुटते त्यामुळे महिला कर्मचारी व विद्यार्थिनींना रात्रीच्या वेळेचा प्रवास सुरक्षित नसल्याने त्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे काही वेळेस जास्तच उशीर झाल्यास शेवटची बस ही काही वेळेस रद्द केली जाते अशावेळी महिला कर्मचारी व विद्यार्थिनींना दौंडला परत कशा येणार हा मोठा गहन प्रश्न निर्माण होत आहे. असेही प्रकार काही वेळेस घडलेले आहेत तसेच गोल्ड राऊंड येथे सुभाष अण्णा कुल बस स्थानक शेडमध्ये सायंकाळच्या वेळी अंधार असतो तेथे काही टारगट टवळखोर व मद्यपी बसलेले असतात. त्यामुळे महिला कर्मचारी व विद्यार्थीनी साठी हे बस स्थानक सुरक्षित दिसून येत नसल्याने तसेच बारामतीहून येणाऱ्या बसेस या गोड राऊंड येथे चढावर कॉर्नरलाच थांबविल्या जातात त्यामुळे मागील येणाऱ्या वाहनांना कॉर्नरवर प्रवासी चढताना पुढून कुरकुम बारामतीकडे येणारे वाहने दिसून येत नाही त्यामुळे तिथे अपघात होण्याची शक्यता आहे एस.टी.बस थांबा यांच्या परिसर या ठिकाणी कचरा घाण रिक्षा पार्किंग वाहतूकदार यांनी वेढलेले असतात. दौंड बस डेपो आगाराचा एक कर्मचारी पूर्वी उपस्थित असायचे ते उपस्थित करावे. वरील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व महिला कर्मचारी प्रवाशांच्या अडचणी दूर न केल्यास डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व इ- वेस्ट मॅनेजमेंट यांच्या वतीने ४ सप्टेंबर २०२४ रोजी रस्ता रोको आंदोलन केले जाईल राज्य परिवहन महामंडळ व दौंड आगार व्यवस्थापक याची दखल घ्यावी.असे निवेदनाद्वारे दिले

- Advertisment -

Most Popular

Recent Comments