वरिष्ठ प्रतिनिधी मूकनायक लक्ष्मण रोकडे दि. २० सप्टेंबर २०२४ आज अमरण उपोषणाचा ०२ दिवस काल दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी भिमसृष्टी येथे बूद्ध वंदना घेवून महामानवास त्रिवार अभिवादन करून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेश द्वारा समोर अमरण उपोषणाला सूरूवात झाली. उपोषण कर्ते आयू. रामभाऊ ठोके व आयु. राजू गायकवाड यांनां भेटायला सर्व समाज एकवटला होता. यावेळी समाज बांधव बोलले की आता माघार घ्यायची नाही सर्व समाज ठोके व गायकवाड यांचे मागे तन-मन-धनाने उभे राहू असा संकल्प समाज बांधवांचे वतिने करण्यात आला.
यावेळी आयु. ठोके व आयु. गायकवाड यांनी जोपर्यंत पालिका प्रशासन माता रमाईचे स्मारकाचे काम सूरू करणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण थांबवनार नसल्याचे सांगीतले.
पिंपरी-चिंचवड मधे भाजपची सत्ता आहे, महाविकास आघाडी सह मिळून पिंपरी चिंचवड शहरात पाच आमदार दोन खासदार आहेत तरी देखिल त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे स्मारक होत नाही ही मोठी शोकांतिका आहे. राजकिय नेत्यांकरवी फक्त आश्वासन दिली जातात. स्मारक बनवण्यासाठी बौद्ध समाज बांधव अनेक वर्षापासून लढा देत आहे तरी पालिका प्रशासनाला जाग येत नाही काल १९ सप्टेंबर २०२४ पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेश द्वारावर बौद्ध समाज बांधव पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने राजू गायकवाड आणि रामभाऊ ठोके आमरण उपोषण करत आहेत तरी सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहावे. अशी विनंती उपस्थित कार्यकर्त्यांच्यावतिने करण्यात आली आज आमरण उपोषणाचा
२ रा दिवस आहे जोपर्यंत प्रशासन भीमसृष्टीला लागून असलेल्या पाठीमागील जागेत त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे स्मारक बांधत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे उपोषण कर्ते व बौद्ध समाज बांधव पिंपरी चिंचवड शहर यांचेवतिने सांगण्यात आले.
यावेळी आमरण उपोषण कर्तें रामभाऊ ठोके व राजू गायकवाड यांनी घोषणा दिल्या.
“लढेंगे जितेंगे या ब्रिद वाक्यासोबत आम्ही एकनिष्ठ आहोत असे ही सांगण्यात आले.