बारामती, दि. ११ (संपादक तुषार गायकवाड):- माळेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस महाराष्ट्राचा सह्याद्री बारामतीचे भाग्यविधाते पद्मभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे नाव देण्यात यावे, या मागणीचे निवेदन दि.९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना रिपब्लिकन सेनेचे बारामती प्रांताधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आले.
महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील ४० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस महापुरुषांचे व थोर समाजसुधारकांची नावे देण्याबाबत मुंबई येथे मंत्रीमंडळात ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये बारामती तालुक्यातील माळेगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वडील स्व. अनंतराव पवार यांचे नाव देण्यात आले आहे. स्व. अनंतराव पवार यांचे सामाजिक कार्य कुठेही आढळुन येत नाही. याउलट आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे कार्य संपुर्ण भारतभर आहे त्यामुळे माळेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस महाराष्ट्राचा सह्याद्री बारामतीचे भाग्यविधाते पद्मभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच बारामतीचे तहसीलदार, माळेगाव नगर पंचायतचे मुख्याधिकारी, माळेगाव शहर पोलिस स्टेशन येथे राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचे संस्थापक प्रशांत विष्णु सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले. त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश महासचिव दत्तात्रय माने, संस्थापक सदस्य विठ्ठल सोनवणे, बारामती तालुका अध्यक्ष महेबुब शेख यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.