Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यातील 10 मतदारसंघातील मतमोजणी शांततेत संपन्न, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते...

कोल्हापूर जिल्ह्यातील 10 मतदारसंघातील मतमोजणी शांततेत संपन्न, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र प्रदान

मुकनायक कोल्हापूर प्रतिनिधी राहुल कांबळे,

मतमोजणी प्रक्रियेत सहभागी निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस व त्यांच्या टिमचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून अभिनंदन

कोल्हापूर दि 23 : जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. दहाही मतदार संघातील विजयी झालेल्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत त्या त्या ठिकाणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये 271 चंदगड विधानसभा मतदार संघात शिवाजी पाटील विजयी, 272 राधानगरी विधानसभा मतदार संघात प्रकाश आबिटकर विजयी, 273 कागल विधानसभा मतदार संघात हसन मुश्रीफ विजयी, 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात अमल महाडिक विजयी, 275 करवीर विधानसभा मतदार संघात चंद्रदीप नरके विजयी, 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात राजेश क्षीरसागर विजयी, 277 शाहूवाडी विधानसभा मतदार संघात डॉ. विनय कोरे विजयी, 278 हातकणगंले विधानसभा मतदार संघात दलितमित्र डॉ.अशोकराव माने विजयी, 279 इचलकरंजी विधानसभा मतदार संघात राहूल आवाडे विजयी तर 280 शिरोळ विधानसभा मतदार संघात राजेंद्र पाटील- यड्रावकर विजयी उमेदवारांचा समावेश होता.

जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची मतमोजणी 144 टेबलच्या माध्यमातून एकुण 245 फेऱ्यांद्वारे पुर्ण झाली. यासाठी सर्व मतदारसंघ मिळून ईव्हीएमसाठी मतमोजणी पर्यवेक्षक 176, सहायक 186, सुक्ष्म निरिक्षक 196 असे एकुण 558 अधिकारी कर्मचाऱ्यांनी कामकाज केले. तसेच पोस्टल मतमोजणीसाठी 126 टेबलच्या माध्यमातून मतमोजणी पर्यवेक्षक 154, सहायक 308, सुक्ष्म निरिक्षक 154 असे एकुण 616 अधिकारी कर्मचा-यांची मतमोजणीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. याचबरोबर प्रत्येक मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था चोख आणि तिहेरी स्तरावर लावण्यात आली होती. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी मतमोजणी प्रक्रियेत सहभागी निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस व त्यांच्या टिमचे अभिनंदन केले.

विधानसभा मतदार संघनिहाय विजयी उमेदवार, पक्ष व मिळालेल्या मतांची संख्या कंसात मताधिक्य

271 चंदगड – शिवाजी सत्तुप्पा पाटील – अपक्ष – 84254 (24134)

272 राधानगरी – प्रकाश आनंदराव आबिटकर – शिवसेना – 144359 (38259)

273 कागल – हसन मियालाल मुश्रीफ – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 145269 (11581)

274 कोल्हापूर दक्षिण – अमल महादेवराव महाडिक – भाजपा – 148892 (17630)

275 करवीर – चंद्रदीप शशिकांत नरके – शिवसेना – 134528 (1976)

276 कोल्हापूर उत्तर – राजेश विनायक क्षीरसागर – शिवसेना – 111085 (29563)

277 शाहूवाडी – डॉ. विनय विलासराव कोरे – जन सुराज्य शक्ती – 136064 (36053)

278 हातकणगंले – दलितमित्र डॉ.अशोकराव माने – जन सुराज्य शक्ती – 134191 (46249)

279 इचलकरंजी – राहूल प्रकाश आवाडे – भाजपा – 131919 (56811)

280 शिरोळ – राजेंद्र शामगोंडा पाटील-यड्रावकर – राजर्षी शाहू विकास आघाडी – 134630 (40816)

- Advertisment -

Most Popular

Recent Comments