Tuesday, January 7, 2025
Homeनाशिकनांदगाव मध्ये चाललेल्या गदारोळा बाबत जिल्हाधिकारी नाशिक यांचे विशेष वृत्त प्रसिद्ध

नांदगाव मध्ये चाललेल्या गदारोळा बाबत जिल्हाधिकारी नाशिक यांचे विशेष वृत्त प्रसिद्ध

नांदगाव मतदारसंघातील परिस्थिती नियंत्रणात
जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

रेणुका गायकवाड महाले नाशिक प्रतिनिधी नाशिक, दि. 20 नोव्हेंबर 2024 * :

महाराष्ट्र विधानसभेच्या 113- नांदगाव मतदारसंघात आज सकाळी दोन उमेदवारांमध्ये मतदारांची ओळख पटविणाऱ्यावरुन वाद निर्माण झाला होता. तेथे पोलिस पथक वेळीच दाखल झाले असून लोकप्रतिनिधीत्व कायद्यान्वये कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.
नांदगाव मतदारसंघात एका उमेदवाराने मतदारांच्या ओळखीवरून संशय व्यक्त केला होता. त्यावरून हा वाद निर्माण झाला होता. तथापि, पोलिस, निवडणूक निरीक्षक वेळीच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच लोकप्रतिनिधीत्व कायद्यासह आदर्श आचारसंहितेनुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मतदारांच्या ओळखीबाबत उमेदवारांना संशय असेल, तर मतदान केंद्रावर मतदान अधिकारी ओळखपत्र पाहून मतदारांची ओळख पटवितात. ते खात्री करूनच मतदारांना मतदानाची परवानगी देतात, असेही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी म्हटले आहे. तसेच या घटनेमुळे मतदान प्रक्रियेवर कोणताही परिणाम झालेला नाही. मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता मतदान करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments