दिनांक.२०/११/२०२४ रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे आणि दिनांक २३/११/२०२४ दुपारपर्यंत पर्यंत सर्व निकाल स्पष्ट होतीलच! आपण सर्वांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होवून 100% मतदान करावे. कोणाला मत द्यावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि पूर्ण स्वातंत्र्य सुद्धा आहे. कुठलाच कार्यकर्ता हा चुकीचा नसतो, जो तो त्याच्या आवडत्या नेत्यांच्या वक्तृत्वावर, कार्यशैलीवर व विचारसरणीने प्रेरित असल्यामुळे त्या नेत्याचा समर्थक असतो. पण त्या समर्थनाच्या नादात तो आपले मित्र, नातेसंबंधी, आपल्या सुखदु:खात मदत करणारे, यांना सुद्धा शत्रू समजू लागतो. त्यामुळे जो निकाल लागेल तो मान्य करून निकालामुळे आपले वैयक्तिक हितसंबंध बिघडू नयेत, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. कोणालाही काही वाईट बोलुन संबंध बिघडवू नका.
शेवटी कुणीतरी एकच उमेदवार जिंकणार, हार जित होत राहणार.
आपला मात्र एकच पक्ष आयुष्यभर राहणार आहे….
तो म्हणजे ” मित्रपक्ष “.