*मुंबई,दि.०६ : महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरीनिर्वाण दिनी यशसिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचेंवतीने *आयु. शिवपुत्र घटकांबळे (महार रेजिमेंट माजी सैनिक)* यांचे नेतृत्वात आज महामानवांना मानवंदना महासलामी देण्यात आली – शिस्त अनुशासनाने सैनिकांच्या निर्भीड “जय भिम, जय भिम, जय भिम” यां सलामी वाक्याने सारा आसमंत निनादला…यामध्ये संस्थेचे राज्यअध्यक्ष सुभेदार प्रदीप गायकवाड, राज्य उपाध्यक्ष आयु.शिवपुत्र घटकांबळे, मुंबई विभागीय अध्यक्ष आयु. अजित न्यायनिरगुणे, पुणे विभागीय अध्यक्ष आयु. बुद्ध कांबळे, विधी सल्लागार ऍडवोकेट राजेंद्र खोब्रागडे, सुभेदार संतोष वानखेडे,सुभेदार भगवान हिंगोले, सुभेदार विश्वनाथ गायकवाड तसेंच समता सैनिक दलाचे सैनिक – सर्व अधिकारी, राजगृहातील सर्व कुटुंबियांचे, लाखो भिम अनुयायींच्या प्रमुख उपस्थितीत दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चें राष्ट्रीय रिपोर्टींग ट्रस्टी कार्याध्यक्ष, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष *डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर* यांनी मानवंदना सलामीसह महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस मानाचे भव्य पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.